लसीकरण झाले म्हणून दुर्लक्ष नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण झाले म्हणून दुर्लक्ष नको
लसीकरण झाले म्हणून दुर्लक्ष नको

लसीकरण झाले म्हणून दुर्लक्ष नको

sakal_logo
By

लसीकरण झाले म्हणून दुर्लक्ष नको
लम्पीचा धोका कायम; जनावरांची काळजी घ्यायला हवी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीची पाऊले उचलत लसीकरण मोहीम हाती घेतली. बहुतांश गाय वर्ग जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे; मात्र लसीकरण झाले म्हणून दुर्लक्ष करणे चुकीचे ठरत आहे. तालुक्यातील लसीकरण झालेल्या तीन बैलांचा मृत्यू हेच स्पष्ट करत आहे. त्यामुळे लसीकरण झाले तरी पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे.
लम्पीस्किन या आजाराने जनावरांना धोका निर्माण केला आहे. दिवसेंदिवस त्याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबविली. प्रत्येक गावात पोचून युद्धपातळीवर गाय वर्ग जनावरांचे लसीकरण पूर्ण केले; मात्र लसीकरण झाले आहे म्हणजे जनावरांचा धोका टळला असे समजणे चुकीचे ठरत आहे. कारण बड्याचीवाडी येथील दोन, तर वडरगे येथील एका बैलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही बैलांचे लसीकरण झाले होते. त्यामुळे पशुपालकांनी लसीकरणानंतरही जनावरांची काळजी घेणे गरजेचे बनत आहे.
जनावरांना लम्पीचा संसर्ग टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. जनावरांचा बाजार बंद असला तरी गावागावांत जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बिनदिक्कत सुरूच आहेत. त्यावर निर्बंध घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.