रिलेत केपी पाटील पॉलिटेक्निकला विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिलेत केपी पाटील पॉलिटेक्निकला विजेतेपद
रिलेत केपी पाटील पॉलिटेक्निकला विजेतेपद

रिलेत केपी पाटील पॉलिटेक्निकला विजेतेपद

sakal_logo
By

60873
गारगोटी : इंटर डिप्लोमा अॅथलेटिक्स स्पर्धेचे उद्‍घाटन करताना मधुआप्पा देसाई. शेजारी जयंत घेवडे, राहूल देसाई, अरविंद चौगुले, एस. ए. मुल्ला आदी. (छायाचित्र : कलासागर फोटो)


रिलेमध्ये केपी पाटील पॉलिटेक्निकला विजेतेपद
इंटर डिप्लोमा अँथलेटिक्स; अमित कात्रे वेगवान धावपटू, सर्वज्ञ सावंत चमकला
गारगोटी, ता. ७ : आंतर पदविका ब गट विभागीय अँथलेटिक्स स्पर्धेत रिलेत मुदाळच्या केपी पाटील पॉलिटेक्निकने विजेतेपद पटकाविले. कोल्हापूरच्या बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकचा अमित मात्रे वेगवान धावपटू ठरला. महागावचा संत गजानन पॉलिटेक्निकचा सर्वज्ञ सावंतने १५००, ८०० मीटर धावण्यात बाजी मारली. येथील इन्सटिट्यूट ऑफ सिव्हिल अँन्ड रुरल इंजिनिअरिंगतर्फे ही स्पर्धा श्री मौनी विद्यापीठाच्या मैदानावर झाली. स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील ४५ पॉलिटेक्निक सहभागी होते.
मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई, राहूल देसाई यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ झाला. संचालक पी. बी. पाटील, कर्मचारी प्रतिनिधी अरविंद चौगुले, प्रा. एस. ए. मुल्ला, पंच प्रमुख संपत सावंत, प्रा. पी. एल. रेगडे, प्रा. एम. बी. कळेकर, प्रा. एन.के. राऊळ, प्रा. आर. आर. तोरसे, प्रा. ए. एन. ढेंगे, एस. बी. शिकलगार उपस्थित होते. स्पर्धा संयोजक दिपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. प्राचार्य जयंत घेवडे यांनी प्रास्ताविक केले.
चुरशीच्या ४ बाय १०० रिलेत केपी पाटील पॉलिटेक्निकच्या खेळाडूंनी पहिल्या ठप्यापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत विजेतेपद मिळविले. यड्रावच्या शरद पॉलिटेक्निकने दुसरा क्रमांक, तर सातारा पॉलिटेक्निक तिसरे आले. शंभर मीटरमध्ये अमित मात्रेने पहिला क्रमांक पटकाविला. सर्वज्ञ सावंतने ८०० आणि १५०० मीटर मध्ये पहिला येत दबदबा राखला.
सविस्तर निकाल असा भालाफेक; मयुर पाटील, विष्णू सुतार, शुभम गायकवाड, गोळाफेक - शान जमादार, प्रदिप सारंग, हर्षद गवराई, थाळीफेक - विष्णू सुतार, शंभुनाथ गवंडी, रोहित सावंत, २०० मीटर धावणे सुहास पाटील, अजय खाडे, यश सोरटे, १०० मीटर - अमित कात्रे, प्रदिप सारंग, अयुष पाटील, १५०० मीटर - सर्वज्ञ सावंत, स्वप्नील पाटील, संकेत शेणवी, ८०० मीटर सर्वज्ञ सावंत, सुमीत बाळेकुंद्री, प्रतिक शिरडोणे. ४०० मीटर - अभिजित आदमापुरी, गौरव वाडकर, अवधुत बरगे.