
लकी वॉरियर्सला विजेतेपद
gad123 .jpg
65891
गडहिंग्लज : जीएफएल स्पर्धेचा विजेता लकी वॉरियर्सला पारितोषिक देताना अनिरूध्द रेडेकर. सोबत बबन कळेकर, आप्पा शिवणे, अमजद मिरा आदी.
--------------------------------------------------------------
लकी वॉरियर्सला विजेतेपद
गडहिंग्लजला जीएफएल सेव्हन साईट फुटबॉल स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : गडहिंग्लज फुटबॉल लिग (जीएफएल) स्पर्धेत लकी वॉरियर्सने लुकमा फायटर्सचा नाणेफेकीवर पराभव करून विजेतेपदासह रोख एकवीस हजार रुपये पटकावले. याच संघाचा विकास जाधव स्पर्धावीर ठरला. येथील गडहिंग्लज फुटबॉल सिटीमार्फत तीन दिवस शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सेव्हन साईट स्पर्धा सुरु होती.
अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. लकी वॉरियर्सचा बाळाप्पा हुलसार तर लुकमाचा ओमकार पाटील यांनी गोल केले. टायब्रेकर आणि सडनडेथमध्येही बरोबरी कायम राहिली. त्यामुळे पंचानी नाणेफेकीवर निर्णय घेतला. यात लकी वॉरियर्सने बाजी मारली. विजयानंतर लकी वॉरियर्सच्या समर्थकांनी जल्लोष केला.
अंतिम सामन्यानंतर अनिरूध्द रेडेकर, सत्यजित मोहिते, बबन कळेकर, आप्पा शिवणे, आदित्य मोहिते, अमजद मिरा, राजू मकानदार, शिवराज पाटील यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली. आदित्य रोटे, किरण बुगडे, प्रशांत सलवादे, अमर गवळी, साकिब मणेर, राकेश परिट, नुमान मुल्ला, चेतन सुतार, ओमकार पाटील यांचा उत्कृष्ट खेळाडूंचा भेटवस्तू देऊन गौरव केला.