वर्ल्ड कप फ्रि किक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्ल्ड कप फ्रि किक
वर्ल्ड कप फ्रि किक

वर्ल्ड कप फ्रि किक

sakal_logo
By

लोगो ः डी मधून...

बाद फेरीत आता
नवोदितांची कसोटी
- दीपक कुपन्नावर.

‘दि ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ असा नावलौकिक असणाऱ्या फुटबॉल विश्वकरंडक साखळी सामन्यांचा रोमाचंक पहिला अंक संपला. अपेक्षेप्रमाणे फ्रान्स, इग्लंड, ब्राझील, अर्जेटिना, पोर्तुगाल, नेदरलँड यांनी आपपल्या गटात अव्वल स्थान पटकाविले, तरी निर्विवाद वर्चस्व राखता आलेले नाही. तुलनेत जपान, अमेरिका, सेनेगल, दक्षिण कोरियांने जिगरबाज खेळ करून अव्वल संघाना जेरीस आणत बाद फेरीत दिमाखात गाठली. खासकरून चार वेळेचा विजेत्या जर्मनीला सलग दुसऱ्या विश्वकरंडकाच्या साखळीतच नामुष्कीजनक गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळेच उत्कंठावर्धक नॉकआऊट फेरीत प्रस्थापितांचा कस तर नवोदितांची कसोटी लागणार आहे.
फ्रान्स वि. पोलंड
गत विजेत्या फ्रान्सला पोलंडचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्कला सहज हरवित त्यांनी आगेकूच केली आहे. मुख्यतः गतविजेत्या संघातील पॉल पॉग्बा, एग्नोलो कांटे, गोलरक्षक डोनारूमा असे आधारस्तंभ नसताना आणि बॉलिन डीऑर पुरस्काराचा मानकरी करीम बेन्झेंमा दुखापतीमुळे ऐनवेळी बाहेर जाऊनही प्रशिक्षक देसचँम्प्स यांनी लय टिकवली. भक्कम बेंच, आक्रमणात कायलिन एम्बापेसारख्या तोफेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केले. जर्मनी आणि स्पेन लीगमध्ये प्रभावशाली ठरलेला रॉबर्ट लेवांडोस्कीवर पोलंडची मदार आहे. खेळाडूंची अष्टपैलू क्षमता लक्षात घेता फ्रान्सचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.

इग्लंड वि. सेनेगल
फुटबॉलमधील ‘टीम इंडिया‘ अशी प्रतिमा असणाऱ्या इग्लंडला आफ्रिका कप जिंकणाऱ्या सेनेगलशी दोन हात करावे लागतील. इराण, वेल्स या दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांचा फडशा पाडणाऱ्या इंग्लडला अमेरिकेने घाम फोडला. प्रशिक्षक गेराथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली गेले ३४ सामन्यात ते अपराजित आहेत. बहरात असणारा रँशफोर्ड, अनुभवी कर्णधार हँरी केन, जँक गार्लिश, डेक्लेन राईस, जॉन स्टोन्स यांच्यामुळे इग्लंड वरचढ वाटतो. आफ्रिकन देशांत सेनेगलचा दबदबा असला तरी वर्ल्डकपचा इतिहास उठावदार नाही. स्पर्धेआधीच हूकमी सादिओ माने जखमी झाल्याने सेनेगलची कोंडी झाली. परिणामी, इग्लंडचे वर्चस्व अपेक्षित असले तरी गोलरक्षक एडोर्ड मँडीचा अडसर दुर करावा लागेल.