''गोडसाखर''च्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाबाबत उद्या बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''गोडसाखर''च्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाबाबत उद्या बैठक
''गोडसाखर''च्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाबाबत उद्या बैठक

''गोडसाखर''च्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाबाबत उद्या बैठक

sakal_logo
By

''गोडसाखर''च्या कार्यक्षेत्रातील
ऊस गाळपाबाबत उद्या बैठक
गडहिंग्लज, ता. ११ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) कार्यक्षेत्रातील ऊस गाळप नियोजनाबाबत मंगळवारी (ता.१३) बैठक होणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोक गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या शाहू सभागृहात दुपारी बाराला ही बैठक होईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीवरून ही बैठक होत आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम बंद आहे. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. उसाचे वेळेत गाळप झाले नाही तर शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी प्रादेशिक सहसंचालकांना निवेदन देत या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत बैठकीचे आयोजन केले आहे.
बैठकीसाठी आजरा, संताजी घोरपडे, हेमरस, अथर्व-दौलत, इको केन शुगर्स यांच्यासह गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेती अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रादेशिक उपसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. शेतकऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. गड्यान्नावर यांनी केले आहे.