
युथ आय लिगसाठी श्रवण जाधवची निवड
70051
------------
युथ आय लिगसाठी
श्रवण जाधवची निवड
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलचा खेळाडू श्रवण विजय गोंधळी याची युवा इंडियन लिग ( युथ आयलिग ) राष्ट्रिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत देशातील २९ राज्यांतील ४९ संघ सहभागी होत आहेत. दहा गटात प्राथमिक तर यातील विजेत्यांत अंतिम फेरी होणार आहे. यात तो गांधीनगर एफसी संघाकडून हैद्राबाद येथे होणाऱ्या अठरा वर्षाखालील स्पर्धेत खेळणार आहे. हैद्राबाद येथे होणाऱ्या इ गटात मुंबई सिटी एफसी, श्री निधी डेक्कन एफसी (तेलगंणा), सिल्वासा युनायटेड एफसी (दमण दीव), जेएपीर एफसी ( पॉडेंचेरी), गांधीनगर एफसी (गुजरात) या संघाचा समावेश आहे. तो सध्या पुण्यातील शासनाच्या शिवछत्रपती क्रोडा प्रबोधनित प्रशिक्षण घेतो आहे. त्याला प्रशिक्षक दिपक कुपन्नावर, धीरज मिश्रा यांचे मार्गदर्शन मिळाले. युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जून बेल्लद आणि संचालक मंडळाचे त्याला प्रोत्साहन मिळत आहे.