नवा कांदा वधारला; लिंबू स्थिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवा कांदा वधारला; लिंबू स्थिर
नवा कांदा वधारला; लिंबू स्थिर

नवा कांदा वधारला; लिंबू स्थिर

sakal_logo
By

फोटो आहे
नवा कांदा वधारला; लिंबू स्थिर
बोराची आवक वाढली; पालेभाज्या, कोथिंबिर, कोबीचे भाव उतरले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : येथील फळबाजारात बोराची आवक वाढली आहे. खराब झालेल्या जुन्या कांद्यामुळे नव्या कांद्याचे दर वधारले आहेत. पालेभाज्या, कोंथिबिर, कोबी, टोमॅटोची आवक अधिक असल्याने भाव उतरले आहेत. लिंबूचे दर पुन्हा स्थिर झाले आहेत. जनावरांच्या बाजार लम्पीमुळे तीन महिन्यांपासून बंदच आहे.
फळबाजारात सोलापूर जिल्ह्यातून चमेली, अपल बोराची आवक वाढली आहे. गोडी चांगली असल्याने मागणी आहे. दरही कमी आहेत. ४० ते ६० रुपये किलो दर आहे. सीताफळांची आवक कमी झाली असून डाळिंब, पेरू, मोसंबी फळांची आवक आहे. सफरचंद, संत्री आवक टिकून आहे. केळी ४० ते ६० रुपये डझन आहेत.
गेल्या पंधरवड्यात जुन्या कांद्याची प्रत खराब येत आहे. परिणामी, मागणीमुळे नव्या कांद्याचा दर वाढला आहे. क्विंटलमागे शंभर, तर किलोमागे दहा रुपयांनी दर वाढल्याचे व्यापारी अमर नेवडे यांनी माहिती दिली. नवा कांदा २५०० ते ३५०० तर जुना १०००-२००० रुपये क्विंटल असा दर आहे. लसणाचे दर कमी असून, २००० ते ७००० रुपये क्विंटल तर ३० ते १०० रुपये किलो दर आहे.
भाजीमंडईत पालेभाज्या, कोथिंबिरचे पेंढीचा शेकडा दर ३०० ते ४०० रुपयापर्यंत आहेत. किरकोळ बाजारात पाच रुपये पेंढी दर आहे. लिंबू आवक वाढल्याने दर स्थिर झाले आहेत. शेकडा १०० ते २०० रुपये दर आहे. फळ भाज्यांचे दर टिकून आहेत. सरासरी ४० ते ६० रुपये असा किलोचा दर आहे. जनावरांच्या बाजार लम्पीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. गेल्या महिन्यापासून प्रमाण कमी होऊनही केवळ प्रशासनाने परवानगी न दिल्याने बाजार बंद आहे.
-----------------
चौकट
नव्या बटाट्याची आवक
भाजीमंडईत तांबूस रंगाच्या बेळगावी बटाट्याची आवक वाढली आहे. विशिष्ट चवीमुळे घरगुती वापरासाठी त्याला मागणी असते. क्विंटलचा १२०० ते १६०० रुपये असा दर आहे. बहुतांश चंडगड तालुक्यातील ही आवक असली तरी हे बटाटे बेळगावी म्हणूनच ओळखली जाते. आग्रा, इंदूरचा १६०० ते २८०० रुपये क्विंटलचा दर आहे. किळकोळ बाजारात २० ते ४० रुपयापर्यंत दर आहेत.