टीसीजी युनायटेड बेबी लिग उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीसीजी युनायटेड बेबी लिग उद्यापासून
टीसीजी युनायटेड बेबी लिग उद्यापासून

टीसीजी युनायटेड बेबी लिग उद्यापासून

sakal_logo
By

टीसीजी युनायटेड बेबी लिग उद्यापासून
फुटबॉल स्पर्धा : पाचवे वर्ष; नवोदित खेळाडूंना पर्दापणाची संधी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : येथील गडहिंग्लज युनानटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेन्ट कन्सोल ग्लोबल (टीसीजी ) फौंडशनतर्फे शनिवारपासून (ता. २५) टीसीजी युनायटेड बेबी लिग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. आठ, दहा आणि बारा वर्षाखालील अशा तीन गटात साखळी पद्धतीने ही स्पर्धा होईल. दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी मं. दू. श्रेष्टी विद्यालयाच्या मैदानावर ‘सेव्हन साईड’ प्रकाराने ही स्पर्धा होईल. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी बालपणापासूनच नवोदितांना खेळण्याची अधिक संधी द्यावी, असे सुचवले. त्यानुसार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) राज्य संघटनाना बेबी लिग स्पर्धा सुरु करण्यासाठी सुचना दिल्या. सहा वर्षापुर्वी लहान मुलांना सामने खेळण्याचा अधिक अनुभव मिळावा यासाठी गडहिंग्लज युनायटेडने टीसीजी फौंडेशनच्या सहकार्याने आठ, दहा आणि बारा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा सुरु केली. पण, कोरोनामुळे दोन वर्षे ही स्पर्धा बंद होती.
लहान खेळाडूंची शारिरीक क्षमता लक्षात घेऊन स्पर्धेसाठी मैदानाचा आकार लहान ठेवला आहे. प्रत्येक संघात सात खेळाडू खेळतील. प्रत्येक शाळेला बारा खेळाडूंची नोंदणी करता येईल. सामन्यातील विजेत्याला तीन, बरोबरीत राहिल्यास प्रत्येकी एक गुण देण्यात येईल. साखळीत सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजेता ठरेल. दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चारनंतर हे सामने होतील. नवोदितांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेत अधिकाधिक संघानी सहभाग घ्यावा, असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जुन बेल्लद, टीसीजीचे अध्यक्ष वैभव गवस यांनी केले आहे. स्पर्धा समन्वयक श्रवण पाटील, अभिषेक कोरवी आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.