Sat, June 10, 2023

सुष्टी रेडेकरला सुवर्णपदक आशियाई क्रॉसकंट्री
सुष्टी रेडेकरला सुवर्णपदक आशियाई क्रॉसकंट्री
Published on : 8 March 2023, 2:09 am
87739
सुष्टी रेडेकर
आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत
सुष्टी रेडेकरला सुवर्णपदक
गडहिंग्लज, ता. ८ : येथील शिवराज महाविद्यालयाची सुष्टी श्रीधर रेडेकर हिने आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. कांठमांडू येथे सोळावी आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धा झाली. सुष्टीने अठरा वर्षाखालील गटात हे सोनेरी यश मिळविले. भारतीय संघाने तीन सुवर्ण आणि एका कास्यपदकाची कमाई केली. सहा किमी क्रॉसकंट्री स्पर्धेत सुष्टीने पहिल्यापासून घेतलेली दमदार आघाडी शेवटपर्यंत टिकवली. तिने २४ मिनिटे पंधरा सेंकदात हे अंतर कापले. या गटात भारताला सांधिक सुवर्ण पदक देखील मिळाले. तिला प्रशिक्षक राहूल मगदूम, जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे सचिव डॉ अनिल कुराडे यांनी तिचे अभिनंदन केले.