युवा आशियाई क्रॉसकंट्रीत 
सृष्टी रेडेकरला सुवर्ण पदक

श्रृष्टी रेडेकरला सुवर्ण

युवा आशियाई क्रॉसकंट्रीत सृष्टी रेडेकरला सुवर्ण पदक श्रृष्टी रेडेकरला सुवर्ण

87894
काठमांडू : येथे युवा आशियाई स्पर्धेत सहा किलोमीटर धावणे स्पर्धेत सृष्टी रेडेकरने आशियाई क्रॉसकंट्रीत सुवर्णपदक पटकावून तिरंगा फडकविला.

युवा आशियाई क्रॉसकंट्रीत
सृष्टी रेडेकरला सुवर्ण पदक
अडथळ्यांवर मात करणारी नेसरीची धावपटू
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : गावात ना मैदान ना प्रशिक्षक; पण तिच्या इच्छाशक्तीपुढे अडथळ्यांची मालिकाही नतमस्तक झाली. मेहनतीच्या जोरावर तिने थेट काठमांडू गाठत सोळाव्या युवा आशियाई क्रॉसकंट्रीत सुवर्ण जिंकत तिरंगा फडकविला. तिने वीस वर्षांखालील गटात सहा किलोमीटर स्पर्धेत ही कामगिरी केली. चार वर्षांच्या खडतर तपश्चर्येची जणू स्वप्नपूर्ती झाली. ही प्रेरणादायक कहाणी नेसरी (ता. गडहिंग्लज)ची प्रतिभावान धावपटू सृष्टी श्रीधर रेडेकर हिची.
रेडेकर यांचे शेतकरी कुटुंब. एस. एस. हायस्कूलमध्ये आठवीत असताना शालेय मॅरेथॉन स्पर्धेत सृष्टी नववी आली. तेव्हापासून तिला धावण्याची गोडी लागली. गावात मैदान नसल्याने लगतच्या तीन किलोमीटरवरील शिप्पूरला छोट्या मैदानावर सकाळ आणि सायंकाळी सरावासाठी हजेरी ठरलेली. अविनाश आळवे यांनी तिला प्राथमिक धडे दिले. ती, तीन वर्षांपासून कोल्हापूरचे उत्तम पाटील आणि अभिजित मस्कर यांचे मार्गदर्शन घेत आहे. तब्बल पाच राष्ट्रीय स्पर्धांत पदकाने हुलकावणी दिल्याने ती कासावीस झाली होती; मात्र, यंदाच्या हंगामात पदक मिळवाचेच, या ध्येयाने झोकून देऊन सराव केला. विशेषतः उणिवा दूर करीत कामगिरी उंचावण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्यामुळेच काठमांडूत भारताला मिळालेल्या चार पदकात केवळ एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक सृष्टीने मिळविले. ती सध्या येथील शिवराज महाविद्यालयात बी. एस्सी.च्या पहिल्या वर्षात असून प्रा. राहुल मगदूम आणि जयवंत पाटील यांचे तिला मार्गदर्शन आहे.

एका पाठोपाठ एक यश
सृष्टीने चार महिन्यांत सर्वोत्तम कामगिरीचा धडाका लावला आहे. नोव्हेंबरमध्ये आसामची राष्ट्रीय स्पर्धा आणि गेल्या महिन्यात मध्यप्रदेशात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने रौप्य मिळविले. हुलकावणी देणाऱ्या सुवर्णपदकाला तिने काठमांडूच्या चुरशीच्या वीस वर्षांखालील सहा किलोमीटरच्या स्पर्धेत गाठून यशाची हॅट्‌ट्रिक साधली.

पाच वर्षांपूर्वीच्या स्थानिक मँरेथान स्पर्धेतील प्रोत्साहनातून आशियाई स्तरावर भरारी घेता आली. सोयीसुविधांचा बाऊ न करता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवला. भविष्यात वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय पदकाचे लक्ष्य आहे.
- सृष्टी रेडेकर, सुवर्णपदक विजेती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com