
युवकाची आत्महत्या
01727
अत्याळ येथील युवकाची
नैराश्यातून आत्महत्या
गडहिंग्लज, ता. ११ : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील युवकाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीत वसंत पाटील (वय ३२) असे मृताचे नाव आहे. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
अभिजीतचे घर गडहिंग्लज-आजरा मार्गावरील ऐनापूर फाटा येथे आहे. तो आई-वडिलांसोबत राहत होता. मुंबईतील खासगी आयटी कंपनीकडे गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होता. कोरोनानंतर तो घरातूनच काम करत होता. दरम्यान, अभिजीत आज आपल्या बेडरूममध्ये कामासाठी गेला. सायंकाळी साडेसहा वाजले तरी बाहेर आला नाही. बेडरूमचा दरवाजा आतून बंद असल्याने वडील वसंत यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता अभिजितने पंख्याला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
नैराश्यापोटी अभिजीतने गळफास घेतल्याची वर्दी चुलतभाऊ उत्तम पाटील यांनी येथील पोलिसात दिली आहे. हवालदार श्री. जाधव अधिक तपास करीत आहेत. अभिजीत अविवाहित होता. त्याच्या मागे आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.