शिवराज, शिवाजी विदयालयची आगेकूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज, शिवाजी विदयालयची आगेकूच
शिवराज, शिवाजी विदयालयची आगेकूच

शिवराज, शिवाजी विदयालयची आगेकूच

sakal_logo
By

88859
गडहिंग्लज : टीसीजी युनायटेड बेबी लिग फुटबॉल स्पर्धेतील चुरशीचा क्षण. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

शिवराज, शिवाजी विद्यालयाची आगेकूच
टीसीजी युनायटेड बेबी लिग; काळू मास्तर, साधना, फुलेची घोडदौड
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : टीसीजी युनायटेड बेबी लिग फुटबॉल स्पर्धेत बारा वर्षे गटात, सावित्रीबाई फुले विद्यालय, शिवाजी विद्यालय, साधना हायस्कूल, बॅ. नाथ पै विद्यालय यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून घोडदौड कायम ठेवली. दहा वर्षे गटात शिवराज स्कूल, काळू मास्तर विद्यालय, सर्वोदय स्कूल यांनी आगेकूच केली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेन्ट कन्सोल ग्लोबल फाउंडेशन (टीसीजी) यांच्यामार्फत म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
बारा वर्षे गटात साधना हायस्कूलने सलग दोन विजय नोंदविले. पहिल्या सामन्यात काळू मास्तर विद्यालयावर चार गोलनी मात केली. साधनाच्या सिद्धार्थ हुलसार आणि अनिरुद्ध पंजाने प्रत्येकी दोन गोल केले. दुसऱ्या सामन्यात नवोदित भडगावच्या केंद्र शाळेला तीन गोलनी हरविले. शिवराज स्कूलने जागृती हायस्कूलला ३-१ असे पराभूत केले. शिवराजच्या अमजंय हातरोटेने एक, तर अलोक पाटीलने दोन आणि जागृतीच्या पवन पोवारने गोल केले. काळू मास्तर विद्यालयाने भडगावच्या केंद्र शाळेचा ३-१ असा पराजय केला. काळू मास्तरच्या विश्‍वजित कांबळेने दोन, तर दर्शन कांबळेने एक गोल मारला.
सावित्रीबाई फुलेच्या समर्थ भालेकरच्या निर्णायक गोलच्या जोरावर भडगावच्या साधना हायस्कूलला नमविले. बॅ. नाथ पै विद्यालयाने भडगावच्या केंद्र शाळेला २-१ अशी मात केली. नाथ पैच्या फरहान इराणी, गौरव मांडेकर यांनी गोल केले. दहा वर्षे गटात शिवराज स्कूलने साधना हायस्कूलचा ४-१ असा फडशा पाडला. शिवराजच्या गौरीश गायकवाडने दोन, तर रणवीर कुराडे, तनिश पाटीलने एक गोल मारला. काळू मास्तरने साई इंटरनॅशनल स्कूलला २-१ असा धक्का दिला. काळू मास्तरच्या प्रेम कांबळेने दोन, तर साईच्या वरद गुरवने एक गोल केला. सर्वोदया स्कूलने केदारी रेडेकर पब्लिक स्कूलचा ३ गोलनी पराभव केला. सुल्तान शेख, अनिकेत कोले, श्रवण पाटील, अभिषेक कोरवी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
---------
चौकट..
पालकांची गर्दी
बेबी लीगमध्ये दहा, बारा वयोगटाचे सामने पाहण्यासाठी पालकांची गर्दी आहे. विशेषतः लहान खेळाडूंना प्रोत्साहनासाठी पालकांची चढाओढ लक्षवेधी आहे.