शिवराज, साधनाला विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज, साधनाला  विजेतेपद
शिवराज, साधनाला विजेतेपद

शिवराज, साधनाला विजेतेपद

sakal_logo
By

91699
गडहिंग्लज: गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे झालेल्या टीसीजी युनायटेड बेबी लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला पारितोषिक राजू भोपळे यांनी दिले. संजय पाटील, गंगाराम नाईक, महादेव पाटील आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------

शिवराज, साधनाला विजेतेपद
टीसीजी युनायटेड बेबी लिग फुटबॉल; काळू मास्तर विद्यालय उपविजेतेपद : कुराडे, कुरबेट्टी स्पर्धावीर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : येथील गडहिंग्लज युनानटेड फुटबॉल असोसिएशन आणि टँलेंट कन्सोन ग्लोबल (टीसीजी ) फौंडशनच्या फुटबॉल स्पर्धेत दहा वर्षे गटात शिवराज स्कुलने तर बारामध्ये साधना हायस्कुलने विजेतेपद पटकावले. काळू मास्तर विद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शिवराजचा अलोक पाटील आणि साधनाचा धीरज कुरबेट्टी यांनी स्पर्धावीरचा बहुमान मिळवला. दीड महिन्यापासून एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचे पाचवे वर्ष असून २२ शालेय संघानी सहभाग घेतला होता.
बारा वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात साधना हायस्कुलने शिवराज स्कुलचा ३-१ असा पराभव करून बाजी मारली. साखळीत अपराजित राहणाऱ्या साधनाच्या दर्शन तरवाळ, अनिरुद्ध पंजा, सिध्दार्थ हुलसार यांनी गोल करुन विजेतेपद साकारले. शिवराजच्या आलोक पाटीलचा गोल संघाचा पराभव टाळू शकला नाही. दहा वर्षाखालील गटात शिवराज स्कुलने अपेक्षेप्रमाणे नवोदित काळू मास्तर विद्यालयावर दोन गोलनी मात करून अजिंक्यपद मिळवले. शिवराजच्या समर्थ शेटके, रणवीर कुराडे यांनी गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. काळू मास्तरच्या विरेंद्र कांबळे, आयन पटेलची लढत अपुरी ठरली.
अंतिम सामना झाल्यानंतर बक्षीस वितरण झाले. अभिजित चव्हाण यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. टीसीजी फौडेंशनचे इंजिनियर गंगाराम नाईक, राजू भोपळे, संजय पाटील, युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील, मुख्याध्यापक कुराडे यांच्याहस्ते विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना क्रिडासाहित्य, चषक देण्यात आले. स्पर्धा समन्वयक श्रवण पाटील, अभिषेक कोरवी यांचा सत्कार झाला. यावेळी सागर पोवार, सुरज कोंडूस्कर यांच्यासह खेळाडू, क्रिडाशिक्षक आणि पालक उपस्थित होते. सुल्तान शेख, सुरज हनिमनाळे, सौरभ मोहिते यांनी पंच म्हणून काम पाहिले.
---------------
सर्वोत्कृष्ट खेळाडू
खेळाडू १० वर्षे १२ वर्षे
स्पर्धा वीर आलोक पाटील (शिवराज) धीरज कुरबेट्टी (साधना)
गोलरक्षक मनिष सातवेकर (काळू मास्तर) प्रणव सुतार (साधना)
बचावपटू आयन पटेल (काळू मास्तर) अर्नजंय हातरोटे (शिवराज)
मध्यरक्षक गौरेश गायकवाड (शिवराज) राजवीर शिंदे (सर्वोदया)
आघाडीपटू शार्दुल देवार्डे (शिवराज) अनिरुद्ध पंजा (साधना)