बोरगलची बैलजोडी सर्वोत्कृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरगलची बैलजोडी सर्वोत्कृष्ट
बोरगलची बैलजोडी सर्वोत्कृष्ट

बोरगलची बैलजोडी सर्वोत्कृष्ट

sakal_logo
By

gad281.jpg
91855
गडहिंग्लज : हट्टीबसवाणी यात्रेनिमित्य झालेल्या सदृढ बैलजोडी स्पर्धेतील विजेत्याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
--------------------------------------------
बोरगलची बैलजोडी सर्वोत्कृष्ट
हट्टीबसवाणा सदृढ जनावरे स्पर्धा; सीमाभागातील पशुपालकांचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : येथील हट्टीबसवाणा यात्रा समितीतर्फे झालेल्या सदृढ जनावरे स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. बोरगलच्या संतू महादेव यशवंत यांच्या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावून रोख सात हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेवर सीमाभागातील पशुपालकांचे वर्चस्व राहिले. सात विविध प्रकारात ही स्पर्धा झाली. जातीवंत जनावरे पाहण्यासाठी गर्दी होती.
संकेश्र्वर मार्गावरील हट्टीबसवाना यात्रेनिमित्त स्पर्धा झाली. दिवसभर जातीवंत जनावरांचे प्रदर्शन सुरु होते. तज्ज्ञ समितीतर्फे जनावरांचे परीक्षण झाले. स्पर्धेसाठी एकुण एक लाखांची पारितोषिके होती. सायंकाळी यात्रा समितीचे तुकाराम पोवार, कल्लापा बनगे, मल्लापा बनगे, शिवलिंग कुरणगे, शंकर कानडे, रामाप्पा बनगे, महादेव बणगे यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसे दिली.
-----------
स्पर्धेचा निकाल
चार ते सहा दाती गट- बसाप्पा गोटूरे ( सोलापूर), नवनाथ चौगुले (म्हाकवे), सरदार उप्पेदार (भडगाव), चॅम्पियन बिनदाती- परीश लोकाप्पा (नांगनुर), मल्लिकार्जून हेगडे (निडसोशी), महादेव केसरकर ( संकेश्र्वर), दोन दाती व चार दाती चॅम्पियन – भिमाप्पा हारूर (हारुगेरी), देवगौंडा पाटील ( शौकिन हासूर), प्रथमेश गायकवाड (कुंरुडवाड), बैलजोडी- संतु यशवंत (बोरगल), दस्तगीर कडलगी ( यल्लीमुन्नोळी), दयानंद हासुरे ( कणगला), खिल्लार गाय- स्वाती कोरी (गडहिंग्लज), राजेंद्र चव्हाण (कांडगाव), काका चौगुले (औरनाळ), बिन दाती जोडी – बसलिंग आंबली (पाश्चापूर), मोहित डोमणे (गडहिंग्लज), कल्लापा बुलाणी (भडगाव), दोन दाती जोडी- सुरेश खोत (सोलापूर), अशोक खवणे (नुल), डॉ. अमित कापसे (औरनाळ).