भडगाव फुटबॉल लीग सोमवारपासून

भडगाव फुटबॉल लीग सोमवारपासून

भडगाव फुटबॉल लीग सोमवारपासून
अर्ध्या लाखाची बक्षिसे; आठ संघ, ८८ खेळाडूंचा सहभाग, वर्ष दुसरे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : तालुक्यातील भडगाव येथे सोमवारपासून (ता. ३) भडगाव फुटबॉल लिग (बीएफएल) स्पर्धेचे आयोजन केले आहे. सात दिवस चालणाऱ्या स्पर्धेत आठ संघातून ८८ फुटबॉलपटू सहभागी आहेत. स्पर्धेसाठी एकूण रोख अर्ध्या लाखांची पारितोषिके आहेत. केंद्र शाळा समोरील क्रीडागंणात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.
आयपीएल क्रिकेटच्या धर्तीवर या स्पर्धेचे स्वरूप आहे. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी गतवर्षापासून स्पर्धा सुरु झाली. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाने स्पर्धा होत आहे. स्पर्धेत आठ संघ आहेत. बोली लावून या संघात खेळाडूंची निवड केली. संघाची दोन गटात विभागणी केली आहे. साखळी पद्धतीने गटातर्गंत ही स्पर्धा होईल. गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेसाठी मैदानाची तयारी केली जात आहे. लोकवर्गणीतून या मैदानाची उभारणी सुरु आहे.
स्पर्धेतील विजेत्याला रोख अकरा हजार, उपविजेत्याला सात हजार, तिसरा पाच तर चौथ्या क्रमांकाला तीन हजारांचे बक्षीस आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक, आघाडीपटू, युवा प्रतिभावान खेळाडूसह स्पर्धावीर ही वैयक्तीक बक्षिसे आहेत. प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडूस सामनावीर तर पराभूत संघातील खेळाडूस लढवय्या म्हणून गौरवण्यात येईल. रोज सायंकाळी दोन सामने होणार आहेत. शनिवारी (ता. ८) सायंकाळी उपात्यं फेरीचे तर रविवारी (ता. ९ ) तिसरा क्रमाकांचा आणि अंतिम सामना होणार आहे.
---------------
सराव जोमात
आठही संघांनी आठ दिवसांपासून जोमाने सराव सुरु केला आहे. संघांनी ड, ई लायसन्स प्रशिक्षक नेमले आहेत. संघात एक पाहूणा खेळाडूही घेतला आहे. नवोदितांना प्रोत्साहनासाठी चौदा वर्षाखालील एका खेळाडूला सामावून घेतले आहे. खेळाडूंच्या सरावामुळे गावात फुटबॉलमय वातावरण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com