रायझिंग स्टार्सची आगेकूच

रायझिंग स्टार्सची आगेकूच

03912
गडहिंग्लज : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लिग स्पर्धेतील समर्थ निकम आणि पारस चव्हाण यांच्यात चेंडूसाठी चढाओढ. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


रायझिंग स्टार्सची आगेकूच
शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट लिग; इफा, दादा जीएम, संघर्ष  सुपर लिगमध्ये
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लिगच्या तिसऱ्या दिवशी युनायटेड रायझिंग स्टार्सने सलग दुसरा विजय नोंदवत आगेकूच केली. साकिब मणेर, अर्थव दावणे यांचे प्रत्येकी दोन गोल करून दिवस गाजविला. इफा लायन्स, दादा जीएम चँलेंजर्स आणि संघर्ष फायटर्स यांनीही सुपर लिगमध्ये प्रवेश मिळविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलमार्फत एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
अष्टपैलू खेळ करीत युनायटेड रायझिंग स्टार्सने  फिजिक जिम वॉरियर्सला मोठ्या गोलफरकाने हरविले. कर्णधार साकिब मणेर, अर्थव दावणे यांनी चौफेर खेळ करून प्रत्येकी दोन गोल मारून फिजिक जिमला नामोहरम केले. नवोदित आयन अत्तारने गोल करून संघाला दिमाखात सुपर लिगमध्ये प्रवेश मिळवून दिला.  फिजिक जिमच्या हर्ष कुलकर्णीचा मैदानी गोल संघाचा पराजय टाळू शकला नाही.
चुरशीचा इफा लायन्स विरुद्ध दादा जीएम चँलेंजर्स सामना १-१ बरोबरीत सुटला. इफा लायन्सचा कर्णधार प्रसाद पोवारची पूवार्धातील आघाडी उत्तरार्धात दादा जीएमच्या अनुभवी शुभम आजगेकरने हेडव्दारे गोल करून बरोबरी साधली. अखेरपर्यंत हाच गोलफरक कायम राहिला. फिजिक जिम, गुफा गार्डीयन निराशाजनक कामगिरीमुळे स्पर्धेबाहेर पडले. ‘अ’ गटातून सर्वाधिक गुणासह युनायटेड रायझिंग स्टार्स (सहा गुण), संघर्ष फायटर्स (३), तर ‘ब’ गटातून इफा लायन्स ( ३), दादा जिम चँलेजर्सं (२) सुपरलिगसाठी पात्र ठरले. या चार संघांत लिगमधून सर्वाधिक गुण असणारे दोन संघ अंतिम सामन्यात पोहचतील.
------------------
चौकट
आजचे सामने
- युनायटेड रायझिंग स्टार्स वि. इफा लायन्स सायंकाळी ४.३० वा.
- संघर्ष फायटर्स वि. दादा जीएम चँलेंजर्स सायंकाळी ५.३० वा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com