संघर्ष फायटर्सची दावेदारी भक्कम

संघर्ष फायटर्सची दावेदारी भक्कम

gad229.jpg
04243
गडहिंग्लज : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमधील सामन्यात विद्याधर धबालेची चढाई रोखताना सुमित पाटोळे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------
संघर्ष फायटर्सची दावेदारी भक्कम
शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लिग; सौरभ शिंदे, अवधूत चव्हाण लक्षवेधी
गडहिंग्लज, ता. २२ : शिवराज युनायटेड डेव्हपमेंट फुटबॉल लिगच्या पाचव्या दिवशी संघर्ष फायटर्सने धडाकेबाज खेळ कायम ठेवत सुपर लीगमध्ये दुसरा विजय नोंदवला. संघर्षने दादा जीएम चॅलेंजर्सला ४-१ असे पराजित केले.
युनायटेड रायझिंग स्टार्सने इफा लायन्सचा ६-१ असा मोठा पराभव केला. राजझिंग स्टार्सचे नवोदित खेळाडू अवधुत चव्हाण, सौरभ शिंदे यांनी प्रत्येकी दोन सुरेख गोल करून लक्षवेधी ठरले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे ही स्पर्धा एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर सुरु आहे.
संघर्ष फायटर्सने दमदार कामगिरी करीत दादा जीएम चॅलेंजर्सला हरवत अंतिम फेरीत पोहचण्याची दावेदारी बळकट केली. तुलनेत रायझिंग स्टार्सला पराभवाचा धक्का देणारा दादा चॅलेंजर्स कामगिरीत सातत्य नसल्याने पराभव झाला. संघर्षचा सौरभ मकशी, कर्णधार श्रवण पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करून आघाडी घेतली. दादाचा कर्णधार शुभम कागिणकरने मैदानी गोल करून सामन्यात झुंज दिली.
सुपर लीगमध्ये पहिल्याच पराभवाने घायाळ झालेल्या रायझिंग स्टार्सने इफा लायन्सला ६-१ असे लोळवत दबदबा ठेवला. सामन्यावर वर्चस्व राखत महत्वपूर्ण सामन्यात खेळ उंचावला. अवधूत चव्हाण, सौरभ शिंदे यांनी प्रत्येकी दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांना अनुभवी श्रवण जाधव, सुमित कांबळे यांनी गोल करून साथ दिली. इफाचा कर्णधार प्रसाद पोवारचा एकमेव गोल संघाचा मोठा पराभव टाळू शकला नाही.
---------------
सामनावीर, लढवय्या
सामनावीर म्हणून सुहास पाटील ( संघर्ष), अवधुत चव्हाण ( युनायटेड रायझिंग स्टार्स) तर लढवय्या म्हणून सर्वेश मोरे (इफा), रिहान अत्तार (दादा चॅलेंजर्स) यांना क्रीडासाहित्य देऊन गौरवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com