फुटबॉलपटूनो, निर्णय क्षमता वाढवा

फुटबॉलपटूनो, निर्णय क्षमता वाढवा

gad251.jpg
04889
गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे प्रशिक्षक परवेज देसाई यांचा सत्कार सुनिल चौगुले यांनी केला. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------
फुटबॉलपटूनो, निर्णय क्षमता वाढवा
परवेझ देसाई; शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लिगमध्ये खेळाडूंसाठी व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : आधुनिक फुटबॉल दिवसेंदिवस अधिक गतिमान होत चालला आहे. पूर्वीचा शारीरिक क्षमतेचा खेळ मागे पडला आहे. तुलनेत कौशल्ये आणि डावपेचांचा वापर वाढला आहे. त्यामुळे उत्कृष्ठ खेळाडू बनण्यासाठी निर्णय क्षमता वाढवा, असा कानमंत्र गुजरातच्या अँरा एफसी संघाचे प्रशिक्षक परवेझ देसाई यांनी दिला.
ते येथील शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लिगमध्ये ‘फुटबॉल आणि संधी’ या व्याख्यानात बोलत होते. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे संचालक सुनिल चौगुले अध्यक्षस्थानी होते. श्री देसाई म्हणाले, ‘दोन दशकात भारतीय फुटबॉलचे चित्र पालटले आहे. व्यावसायिक फुटबॉलमुळे अनेक संधी वाढल्या. खेळाडूंना इंडियन फुटबॉल लिग (आयलिग), इंडियन सुपर लिग(आएएसएल) यासह शेकडो व्यावसायिक संघात संधी आहे. व्यवस्थापक, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ञ, मानोसपचार तज्ञ, विश्लेषक, ट्रेनर, गोलरक्षक प्रशिक्षक, प्रसिद्धी प्रमुख, छायाचित्रकार, सीईओ अशा पदावर व्यावसायिक संघात मागणी आहे.’
श्री. देसाई यांनी डिएसके शिवाजीयन्स, नॉर्थ ईस्ट युनायटेड, मिर्नवा पंजाब एफसी या नामवंत संघातील अनुभवाचे पदर उलगडून सांगितले. फुटबॉलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विकासात तंत्रज्ञानाचे महत्व आहे. खेळ उंचावण्यासाठी नवोदितांना अधिक सामने खेळायला हवेत. परदेशात यावर अधिक भर आहे. त्यामुळे ते जागतिक फुटबॉलमध्ये वरचढ आहेत. गडहिंग्लज या छोट्या केंद्रात हिच संकल्पना घेऊन युनायटेडचे सुरु असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. श्री चौगुले म्हणाले, ‘युनायटेडच्या खेळाडूंचा सर्वांगिण विकास हेच ध्येय ठेवून काम सुरु आहे. नवोदितांनी वापर करून प्रगती साधावी.’ गुंडू पाटील, सुरज तेली, सौरभ जाधव, उमेश देवगोंडासह पालक, खेळाडू उपस्थित होते. समन्वयक सागर पोवार यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रशिक्षक श्री देसाई यांची ओळख करून दिली. ओमकार घुगरी यांनी आभार मानले. हुलाप्पा सुर्यवंशी यानी सुत्रसंचालन केले.
---------------
निरीक्षण निर्णायक
दर्जेदार फुटबॉल खेळण्यासाठी अधिक गतीने विचार करणे गरजेचे आहे. कमीत कमी वेळेत अधिकाधिक चांगला निर्णय घेईल, तोच अधिक उठावदार खेळ करू शकतो. त्यासाठी खेळाडूंची निरीक्षण क्षमता निर्णायक ठरते. यासाठी खेळाडूंनी जागरुकतेने निरिक्षण करायला शिकायला पाहिजे, असे मत श्री. देसाई यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com