पाँलिटेक्निक प्रवेश

पाँलिटेक्निक प्रवेश

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू
तंत्रशिक्षण संचालनालय : २१ जूनअखेर मुदत, २९ जूनला पक्की गुणवत्ता यादी

सकाळ वृत्तसेवा
ग़डहिंग्लज, ता. १ : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उद्या (ता. २) दहावीचा ऑनलाईन निकाल लागणार असला तरी विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने २१ जूनअखेर अर्ज करण्याची मुदत आहे. कच्ची गुणवत्ता यादी २३ जनूला तर पक्की २९ जूनला जाहीर होणार आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही दहावीचा निकाला आधीच ही प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने http://poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज सादर करावयाचे आहेत. खुल्या गटासाठी ४०० तर राखीव प्रवर्गाला ३०० रुपये प्रवेश अर्ज शुल्क आहे. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी पॉलिटेक्निक या प्रक्रियेसाठी अर्ज सुविधा केंद्र आहेत. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत येथे मोफत अर्ज भरण्याची सुविधा असल्याची माहिती गारगोटीच्या आयसीआरईचे प्राचार्य जयंत घेवडे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मुळ प्रमाणत्रे याच कालावधीत पडताळणी करून घ्यावयाची आहेत.
विद्यार्थ्यांना २१ जूनअखेर अर्ज सादर करण्याची मुदत आहे. प्रवेशाची कच्ची गुणवत्ता यादी २३ जूनला जाहीर होईल. त्यावर २७ जूनअखेर हरकती नोंदविण्याची मुदत आहे. २९ जुनला पक्की यादी लागेल. त्यानंतर पसंतीक्रम भरण्याच्या फेऱ्या होणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर करणार असल्याचे तंत्रशिक्षण संचलनालयाने स्पष्ट केले आहे. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया पोर्टल आणि ॲपचे उद्‌घाटन मुंबईत झाले. या वेळी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

चौकट..
दृष्टिक्षेपात प्रवेश
प्रवेश अर्जाची मुदत- १ ते २१ जून
कच्ची गुणवत्ता यादी- २३ जून
हरकतीसाठी मुदत- २७ जून
पक्की गुणवत्ता यादी- २९ जून
एकूण संस्था- ३७५
प्रवेशक्षमता- १ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com