शिक्षण, समाजकारण, उद्योग क्षेत्रात शाहूंचे कार्य अदभूत : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण, समाजकारण, उद्योग क्षेत्रात शाहूंचे कार्य अदभूत : पाटील
शिक्षण, समाजकारण, उद्योग क्षेत्रात शाहूंचे कार्य अदभूत : पाटील

शिक्षण, समाजकारण, उद्योग क्षेत्रात शाहूंचे कार्य अदभूत : पाटील

sakal_logo
By

06652
किणी : राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त किणी हायस्कूलमध्ये आयोजित व्याख्यानात बोलताना महेश पाटील. व्यासपीठावर एस. बी. शिरोटे, डी. डी. चव्हाण, बी. डी. मलगुंडे, एस. के. सूर्यवंशी आदी.

शिक्षण, समाजकारण, उद्योग
क्षेत्रांत शाहूंचे कार्य अद्‌भुत : पाटील
घुणकी : शिक्षण, समाजकारण, क्रीडा आणि उद्योग या क्षेत्रांत शाहू महाराजांनी अद्‌भुत कार्य केले, असे मत महेश पाटील यांनी व्यक्त केले. लोकराजा शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी, एकाच वेळी शंभर व्याख्याने आयोजित करणे या उपक्रमांतर्गत किणी हायस्कूलमध्ये पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व शेती सुधारणा याबाबत विवेचन केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका एस. बी. शिरोटे, पर्यवेक्षक डी. एच. पाटील, सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यू. एम. पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. एम. ए. मोहिते यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04756 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top