
घुणकी परिसरात राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली
06663
घुणकी : वैशाखी वारीसाठी पायीं दिंडीतून निघालेल्या किणी (ता. हातकणंगले) येथील वारकऱ्यांनी तासगाव (जि. सांगली) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.
-------------
घुणकी परिसरात वंदन
घुणकी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आज सकाळी दहा वाजता किणी, घुणकी, वाठार, नवे पारगाव, जुने पारगाव, निलेवाडी, चावरे, तळसंदे, अंबप, अंबपवाडी, पाडळी, मनपाडळे परिसरात १०० सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली अर्पण केली. ग्रामपंचायत, सहकारी संस्था, शाळामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, सरकारी दवाखाने, तलाठी सज्जे, सरकारी आस्थापना मध्ये छत्रपती शाहूमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दहा वाजता शंभर सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली.शाळामध्ये शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे झाली.
------------------
डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक महाविद्यालय
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक महाविद्यालयात शाहू महाराजांना आदरांजली अर्पण केली. प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, पी. डी. उके, ए. बी. गाताडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मयूर शेळके व कौस्तुभ खोत, गणेश लोळगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संदीप पाटील, शिल्पा माळी, स्वयसेवकांनी केले. भूषण इंगवले यांनी सूत्रसंचालन केले.
-------------
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय
घुणकी : डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात प्राचार्य डी. एन. शेलार आणि आर. आर. पाटील यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांनी शाहू महाराजांच्या योगदानाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. एस. एम. घोलपे यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04762 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..