
विवेक वाचनालयाची व्याख्यानमाला
06669
-------
व्याख्यानमालेद्वारे प्रबोधनाचा जागर
अंबपमध्ये विवेक वाचनालयातर्फे आयोजन; तज्ज्ञांचे मार्गदर्शन
घुणकी, ता. १० : अंबप (ता. हातकणंगले) येथील विवेक वाचनालयाची विवेक व्याख्यानमाला उत्साहात झाली. यातून सामाजिक बांधिलकी, शिवरायांची रणनिती, माणुसकी हवी, शरीर स्वास्थ्यासाठी योगांची गरज आणि हसण्यातूनच जीवन आनंदी होते आदी पैलूंचे दर्शन घडले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष बी. टी. पाटील होते.
संभाजी यादव (कौलव) यांनी ‘हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. राजकीय नेते, अभिनेते, पक्षी, प्राणी व समाजातील घटक यांच्या विनोदी घटनांचा आविष्कार त्यांनी घडवला. दुसरे पुष्प प्रा. मधुकर पाटील यांनी ‘जगावे शिवबासारखे, लढावे शंभूराजासारखे’ या विषयावर गुंफले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. तिसऱ्या पुष्पमध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी ‘युद्ध नको शांतता हवी’ या विषयावर युद्धामुळे देशाला होणारी हानी आणि शांततेमुळे देशात होणारा विकास यावर विवेचन केले.
गीतांजली बहेनजी यांनी ‘आजचा युवक व भविष्याची दिशा’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना आजच्या तरुणाला शांततेने व संयमाने आपल्यापुढील आव्हाने पेलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ‘यौगिक शाश्वत शेती’ या विषयावर विजय सुतार यांनी पाचवे पुष्प गुंफले. महेंद्र कुलकर्णी यांनी ‘चला नाती जपूया’ या विषयावर सहावे पुष्प गुंफताना समाजात नात्यांची गुंफण किती महत्त्वाची आहे, याची माहिती देऊन माणूस माणसाला जोडत गेला तर आयुष्य किती सुखमय होते हा विचार मांडला.
व्याख्यानमालेत विलास नाईक, शंकर दाभाडे, दिव्या कुलकर्णी, दयानंद कांबळे, नीलम पाटील, वेदांत साळुंखे, चंद्रकांत अंबपकर, करीम आत्तार, कृष्णात कार्वेकर, विजय सुतार, अथर्व पाटील, बाळासाहेब माने, दत्तू वठारे, बाळासाहेब कांबळे व वीरपत्नी मालूताई कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
माजी सरपंच संपतराव कांबळे यांनी स्वागत केले. राहुल माने यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह विनायक माने यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले. सरपंच बी. एस. आंबेडकर, पोलिस पाटील पंढरीनाथ गायकवाड, प्रदीप तोडकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष उंडे, प्रदीप वाडेकर, आनंदराव विभुते, डॉ. बी. के. पाटील, दिलीप सावर्डेकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04766 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..