
मनपाडळे विकास सेवा सोसायटीत सत्तांतर
मनपाडळे विकास सेवा सोसायटीत सत्तांतर
जुगाई महाविकास आघाडीने आठ जागा जिंकल्या; कार्यकर्त्यांकडून आनंदत्सव
घुणकी, ता. ११ : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथील मनपाडळे विकास सेवा संस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच राजेंद्रकुमार पाटील, संस्थेचे माजी चेअरमन अरुण शिंदे, संजय पाटील, दत्तात्रय आसगावकर, वसंत चौगुले, मधुकर सुर्यवंशी यांच्या जुगाई महाविकास आघाडी पॅनेलने आठ जागा जिंकत सत्तांतर घडवले. सत्ताधारी, वारणा बँकेचे माजी संचालक हंबीरराव शिंदे, जयदीप सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील जुगाई शेतकरी सहकारी पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले.
१३ जागेसाठी २६ उमेदवार रिंगणात होते. २७४ सभासदांपैकी २७२ सभासदांनी मतदान केले. त्यामुळे निवडणूक दोन गटात चुरशीने झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र शिंदे होते. कार्यकर्त्यांनी फटाके व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
जुगाई महाविकास आघाडी पॅनेलचे विजय उमेदवार असे : महिपती सदाशिव पाटील ( १३९), विलास तुकाराम पाटील (१३६), विजयकुमार जयवंतराव पाटील (१३५), अशोक आनंदराव शिंदे (१३१), रंगराव पांडुरंग सूर्यवंशी (१२८), धोंडीराम कीशाब्बास सूर्यवंशी (१२७) पांडुरंग बाळासो सुतार (१३२), महिपती शंकर दबडे (१४०).
जुगाई शेतकरी सहकारी पॅनेलचे विजयी उमेदवार : महिपती धोंडी पाटील (१३२), भीमराव राजाराम सूर्यवंशी (१२६) बाळासो रंगराव बंडगर (१३३), वर्षा तानाजी पाटील (१३०), लता दिलीप सूर्यवंशी (१२८).
------------------------
...आणि चिठ्ठीवर विजयी घोषित
सर्वसाधारण गटात विश्वास शिंदे व भीमराव सूर्यवंशी दोघांनाही १२६ अशी समान मते मिळाल्याने चिठ्ठी उचलण्यात आली. यामध्ये भीमराव सूर्यवंशी विजयी झाले.
----------
Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04773 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..