डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये करिअर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये करिअर मार्गदर्शन
डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये करिअर मार्गदर्शन

डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये करिअर मार्गदर्शन

sakal_logo
By

06702

----
डी. वाय. पाटील कॅम्पसमध्ये करिअर मार्गदर्शन
घुणकी, ता.२०: विद्यार्थ्यांनी करिअर करताना आपली आवड, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी, भविष्यातील रोजगार संधी याचा विचार करून करिअर निवडावे, असे आवाहन डी. वाय. पाटील कॅम्पसचे संचालक डॉ. सतिश पावसकर यांनी केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमधील पॉलीटेक्निक महाविद्यालयमध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन आयोजित केले. यावेळी डॉ. पावसकर बोलत होते.
डॉ. पावसकर यांनी दहावीनंतरचे करिअर कसे करावे याबाबत विवेचन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रा. विवेक चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अक्षय खामकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संदीप चौगुले यांनी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष, गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04783 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top