बेकायदेशीर टोल व वाढीस टोल आकारणी बंद करुन टोलमुक्त हा महामार्ग करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदेशीर टोल व वाढीस टोल आकारणी बंद करुन टोलमुक्त हा महामार्ग करावा
बेकायदेशीर टोल व वाढीस टोल आकारणी बंद करुन टोलमुक्त हा महामार्ग करावा

बेकायदेशीर टोल व वाढीस टोल आकारणी बंद करुन टोलमुक्त हा महामार्ग करावा

sakal_logo
By

06893

राष्ट्रीय महामार्गावरील
टोल वसुली बंद करा
जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनची मागणी
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. ५ : पुणे बंगळूर महामार्गावरील शेंद्रे (सातारा), किणी व तासवडे येथील बेकायदेशीर टोल आकारणी बंद करावी अशी मागणी जिल्हा डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिले. निवेदन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनाही पाठविल्याचे नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे गोविंद बेरवा, चंद्रकांत बर्डे यांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे, शेंद्रे, किणी व तासवडे टोल नाक्याची मुदत संपली आहे. महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात होता. तो आता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला आहे. हस्तांतरित केल्यानंतर टोल बंद करून बांधा वापरा व हस्तांतरित करा या नियमाप्रमाणे टोलमुक्त होणे गरजेचे होते. परंतु सहापदरीच्या नावाखाली टोल नाक्यावर ६० ते ७० टक्के टोलमध्ये वाढ करून वसुली केली जात आहे. ही वसुली अन्यायकारक आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळामध्ये अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, खजिनदार, प्रकाश केसरकर, संचालक शिवाजी दादा चौगुले, विलास पाटील, पराग जोग, मंगेश मोगणे श्रेयस शिंदे यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04879 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..