
ड्रॅगन फळ लागवडीबाबत मार्गदर्शन
06977
--------------
ड्रॅगन फळ लागवडीबाबत मार्गदर्शन
घुणकी, ता. २२ : ड्रॅगन फळांना महत्त्व आले आहे. याच्या मागणीचा सतत चढता आलेख असल्याचे सांगोला येथील रुख्मिणी फार्म व नर्सरीचे संचालक महेश आसबे यांनी सांगितले.
तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात ‘सुधारित ड्रॅगन फळ लागवड व कृषी उद्योजकतेमधील उपलब्ध संधी’ या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी ड्रॅगन फळ लागवड व त्यातील संधी, तसेच उत्पादनातील पंचसूत्री घटकांवर भर दिला. तसेच ड्रॅगन फळातील भारताचे भविष्य, तांत्रिक ज्ञान, बाजाराचे महत्त्व, निर्यातीच्या संधी आणि विविध प्रक्रिया पदार्थ आदी मुद्यांवर मार्गदर्शन केले. याबाबत स्वतःचे अनुभव सांगून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या पिकाकडे वळण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयीन परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या तसेच बाहेरील संसाधनांचा वापर करून कृषी पदवीधारकांनी विविध व्यवसायांमध्ये उत्तम करिअरची संधी शोधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांनी केले. डी. वाय. फार्म, कोल्हापूरचे हेड प्रा. ए. बी. गाताडे, प्रा. आर. आर. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एम. जी. लगारे, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. व्ही. बी. शिंदे, डॉ. एन. आर. कडगे उपस्थित होते. यावेळी बी. एस. ॲग्रिकल्चरचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रेरणा रेळेकर या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी गणेश पवार याने सूत्रसंचालन केले. रोहन धनावडे याने आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04922 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..