विश्ववारणा स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्ववारणा स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस
विश्ववारणा स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस

विश्ववारणा स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस

sakal_logo
By

06988
--------
विश्ववारणा स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस
घुणकी, ता. २६ : कारगिल युद्धात मी सहभागी होतो. प्रत्येक सैनिक जिवाची बाजी लावून लढल्यानेच यश आले. अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी युवकांनी देशसेवेला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत कोल्हापूर जिल्हा सैनिकी फेडरेशनचे कार्याध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके यांनी तळसंदे (ता. हातकणंगले) येथे व्यक्त केले.
येथील विश्व वारणा पब्लिक स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा केला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कॅप्टन घोडके, कॅप्टन संपत परीट, सुभेदार मेजर संजय शिंदे, सुभेदार रामचंद्र पवार आदींच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी कारगिलच्या युद्धभूमीवर हे देशभक्तीपर समूहगीत सादर केले. मुख्याध्यापक रमेश पाटील, सचिव डी. पी. पाटील, बी. एस. पाटील व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुभेदार सयाजी शिंदे यांनी कारगिलचा इतिहास मांडला. आजी-माजी सैनिकांचा व दहावी व अकरावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. हवालदार गोरखनाथ नरुटे, हवालदार, अमर पानसकर, भिकाजी घाडगे, कुमार गायकवाड, नाईक सुभेदार शिवाजी धनवडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04928 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top