शेतीमाल प्रक्रिया व विपणन बनवेल देशाला महासत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीमाल प्रक्रिया व विपणन बनवेल देशाला महासत्ता
शेतीमाल प्रक्रिया व विपणन बनवेल देशाला महासत्ता

शेतीमाल प्रक्रिया व विपणन बनवेल देशाला महासत्ता

sakal_logo
By

07002

------
कृषी क्षेत्राकडे संधी म्हणून पाहावे
मच्छिंद्र कुंभार; तळसंदे येथील कृषि महाविद्यालयात व्याख्यान
घुणकी, ता.२८ : विद्यार्थ्यानी कृषी क्षेत्राकडे संधी म्हणून पाहणे आवश्यक असून आपल्या ज्ञानाचा उपयोग या क्षेत्राच्या विकासासाठी करणे गरजेचे आहे. शेतीमाल उत्पादना बरोबरच त्यावरील प्रक्रिया व विपणन यावर भर दिल्यास देश महासत्ता बनेल असा विश्वास ‘कृषी भूषण’ शेतकरी मच्छिंद्र कुंभार यांनी तळसंदे (ता. हातकणंगले) येथे व्यक्त केला.
तळसंदे येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात कृषीशास्त्र विषयांतर्गत आयोजित ‘एक्सपर्ट लेक्चर’ मध्ये ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परंपरेनुसार रोपट्यास पाणी घालण्यात आले. स्मितेश शहा या विद्यार्थ्याने स्वागत केले. अकॅडमीक इनचार्ज पी. डी. ऊके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
मच्छिंद्र कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शेतीमाल प्रक्रिया व विपणन यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. केमिकल फ्री शेतमाल, मार्केटिंगच्या नवीन पद्धती विकसित करणे, प्रोडक्शन टू व्हॅल्यू ॲडिशन हे तत्व जोपासणे, नगदी पिकांसोबत आंतरपिके घेणे व त्यातून शेतीचा खर्च काढणे, प्रत्यक्ष शेती करण्याची गरज व शेतीमध्ये संशोधनाचे महत्व व गरज याबबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. संदीप पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04934 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top