घुणकी-चावरे रस्त्याची चाळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुणकी-चावरे रस्त्याची चाळण
घुणकी-चावरे रस्त्याची चाळण

घुणकी-चावरे रस्त्याची चाळण

sakal_logo
By

घुणकी-चावरे रस्त्याची चाळण
ग्रामीण रस्ते विकासच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी
घुणकी, ता. २१: मुख्यमंत्री सडक योजनेतून सुमारे पाच कोटी खर्चुन साकारलेल्या घुणकी फाटा ते निलेवाडी दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. ग्रामीण रस्ते विकासच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत पाहणी करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून २०१७ मध्ये पुणे-बंगळूर महामार्गावरील घुणकी फाटा ते निलेवाडी दरम्यान आठ किलोमीटर रस्ता मंजूर होऊन कार्यकारी अभियंता, ग्रामीण रस्ते विकास कोल्हापूर यांच्या नियंत्रणाखाली काम केले. या रस्त्यासाठी ५ कोटी ४ लाख २२ हजार रुपये खर्च झाला. हा रस्ता २०१८ मध्ये पूर्ण झाला. रस्ता पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने पाच वर्षे देखभाल करावयाची असून देखभालीची मुदत २०१८ ते २०२३ पर्यंत आहे. देखभालीसाठी ३४ लाख ८७ हजार रुपयांची सोय आहे. हा रस्ता झाल्यापासून घुणकी ते चावरे दरम्यान वारंवार हा रस्ता खराब झाला आहे. बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूला नाले काढलेले नाहीत. यावर्षी या रस्त्याची डागडुजी केली पण पहिल्याच पावसात या रस्त्याची चाळण झाली आहे. पुण्याहून वारणानगर, रत्नागिरीकडे जाणारी वाहने घुणकी, चावरे तळसंदे मार्गाने जातात येतात. तसेच किणी येथील पथकर नाका चुकवण्यासाठी वाहने या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची चाळण झाल्याने खड्ड्यात पाणी साचून मोटरसायकलस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाने उघडिप देताच या रस्त्याची किमान डागडुजी करणे गरजेचे आहे.
------
उन्हाळ्यात या रस्त्यावरील खड्डे बुजवले त्यावेळी मी उपस्थित होतो. डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरले. डांबर कमी वापरु नका असे मी सांगितले. पण ऐकले नाही. त्यामुळे पुन्हा खड्डे पडले. त्यामुळे झालेला खर्च पाण्यात गेला. शासनाने अशा ठेकेदारांना दंड ठोठावला पाहिजे.
-जयसिंग कुरणे,
माजी उपसरपंच, घुणकी

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04979 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..