वडगांव तालुका कृती समिती महसूल मंत्री विखे पाटील यांना भेटून निवेदन देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगांव तालुका कृती समिती महसूल मंत्री विखे पाटील यांना भेटून निवेदन देणार
वडगांव तालुका कृती समिती महसूल मंत्री विखे पाटील यांना भेटून निवेदन देणार

वडगांव तालुका कृती समिती महसूल मंत्री विखे पाटील यांना भेटून निवेदन देणार

sakal_logo
By

वडगाव तालुका कृती समिती आक्रमक
ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया; महसूल मंत्री विखे पाटील यांना निवेदन देणार
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. २० : इचलकरंजी तालुका व्हावा म्हणून आमदार प्रकाश आवाडे प्रयत्न करतात. मग नियोजित वडगाव तालुक्यासाठी लोकप्रतिनिधी का पुढाकार घेत नाहीत, असा सवाल वडगाव परिसरात व्यक्त होत आहे. दरम्यान रविवारी (ता. २१) सकाळी वारणानगर दौऱ्यावर येणाऱ्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वडगाव तालुका कृती समिती निवेदन देऊन भूमिका मांडणार आहे. वडगावचा दसरा बाजार प्रसिद्ध असून, परराज्यातून जनावरे खरेदीसाठी लोक येतात. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांची समाधी वडगावचे भूषण आहे. वडगाव पालिकेची निर्मिती १९८७ मध्ये झाली आहे. वडगाव शहर ४० गावचे मध्यवर्ती ठिकाण असून त्यांचा गावाशी संपर्क साधावा लागतो. वडगावमध्ये न्यायालय, बाजारपेठ, शिक्षण संस्था, बाजारसमितीसह विविध संस्थांचे जाळे आहे. त्यामुळेही लोकांचा सतत वडगावशी संपर्क ठेवावा लागतो. तालुक्याचे ठिकाण हातकणंगले दूर असल्याने पाडळी, अंबपवाडी, निलेवाडी गावातील लोकांचा नाहक वेळ व पैसा खर्च होतो. म्हणून १९८५ पासून वडगाव तालुका होण्यासाठी मागणी होत आहे. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी, हुपरी, शिरोली, पेठवडगाव मोठी लोकसंख्या असलेली शहरे आहेत. काही वर्षे मागणी वडगाव तालुका कृती समिती कार्यरत असून यापूर्वी वडगावचे नगराध्यक्ष विजयसिंह यादव, कायदेपंडित अँड. पी. के. चौगुले, माजी आयुक्त गुलाबराव पोळ, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर साळुंखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राजकारण विरहीत वडगाव तालुका होण्यासाठी प्रयत्न केला.
तालुक्यातील ६२ पैकी ३० गावात वडगाव तालुका होण्यासाठी विशेष ग्रामसभा घेतल्या. २२ एप्रिल २०१२ ला विजयसिंह यादव, प्रभाकर साळुंखे, राजेंद्रकुमार पाटील, संजय पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. आंदोलन केली. परंतु अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान, रविवारी दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना वारणानगर येथे भेटून कृती समिती निवेदन देणार आहेत. पुन्हा एकदा वडगाव तालुका होण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र आहे.


इचलकरंजीप्रमाणे वडगाव तालुका होणे जनतेच्या हिताचे आहे. गेली अनेक वर्षे शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जनतेचा विचार करून वडगाव तालुका करणे गरजेचे आहे.
- प्रभाकर साळुंखे, वडगाव तालुका कृती समिती