रसिक रंजन वाचनालय तरुणांचे मार्गदर्शन केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसिक रंजन वाचनालय तरुणांचे मार्गदर्शन केंद्र
रसिक रंजन वाचनालय तरुणांचे मार्गदर्शन केंद्र

रसिक रंजन वाचनालय तरुणांचे मार्गदर्शन केंद्र

sakal_logo
By

07190

-----
रसिक रंजन वाचनालय मार्गदर्शन केंद्र
हिंदूराव पाटील; घुणकी येथे पारितोषिक वितरण, गुणवंतांचा सत्कार
घुणकी, ता. २ : रसिक रंजन वाचनालय हे तरुणांचे मार्गदर्शन केंद्र आहे. याचा लाभ शेकडो विद्यार्थी घेत आहेत, असे प्रतिपादन रसिक रंजन वाचनालयाचे अध्यक्ष हिंदूराव पाटील यांनी येथे केले.
येथील रसिक रंजन वाचनालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पारितोषिक वितरण व गुणवंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
वाचनालयाचे कार्यवाह संपतराव पाटील यांनी स्वागत केले. ‘सकाळ’चे बातमीदार संजय पाटील, तळसंदेचे उपसरपंच शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पाटील यांना जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, तळसंदेच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शिवाजीराव पाटील यांचा सत्कार केला. निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष हिंदूराव तेली, खजिनदार शंकराव तेली, संचालक प्रा. तुकाराम खतकर, प्रा. अशोकराव जाधव, जयसिंग पाटील, महेश खताळ आदी उपस्थित होते. ग्रंथपाल सर्जेराव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रा. अशोकराव जाधव यांनी आभार मानले.
निबंध स्पर्धेतील गटवार विजेते असे ः लहान गट (पाचवी ते सातवी) सिद्धी मोकाशी (शिवाजी हायस्कूल घुणकी), दुर्वा गुरव (रूकडी), निष्ठा जठार (इचलकरंजी).
मोठा गट तेजस गायकवाड (आदर्श गुरुकुल, वडगाव) अथर्व मगदूम, समर्थ पाटील (छत्रपती शिवाजी हायस्कूल, घुणकी).
खुला गट- मंजिरी मोकाशी (वारणानगर), दीक्षा मोहिते, मयुरी पाटील (घुणकी).

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05030 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..