क्षमाभाव दशधर्माचा पाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षमाभाव दशधर्माचा पाया
क्षमाभाव दशधर्माचा पाया

क्षमाभाव दशधर्माचा पाया

sakal_logo
By

लोगो ः ॲड. कुचनुरे स्मृती व्याख्यानमाला
-------
07239
किणी : येथे ॲड. वीराचार्य कुचनुरे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्रा. सवींद्र पाटील.
-----------
क्षमाभाव दशधर्माचा पाया
प्रा. सवींद्र पाटील; ‘संस्काराची आवश्यकता’वर व्याख्यान
घुणकी, ता. ५ : क्षमाभाव हा दशधर्माचा पाया असून, मनामध्ये येणाऱ्या विकल्पापासून मुक्ती मिळवण्यासाठीच पर्युषण किंवा दशलक्षण पर्व येतो. मी कोण, माझे शरीर, माझा आत्मा कोणाचा आणि आत्म्याचे चिंतन करण्यासाठी दशधर्मातील हे १० दिवस महत्त्वाचे आहेत, असे मत प्रा. सवींद्र पाटील यांनी किणी (हातकणंगले) येथे केले.
ॲड. विराचार्य कुचनुरे स्मृती व्याख्यानमालेत ‘संस्काराची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजगोंडा पाटील (सतगोंड) हे होते. प्रा. प्रदीप मगदूम (खोची) यांचेही ‘संस्काराची आवश्यकता’ यांनीही ‘संस्काराची आवश्यकता’ याच विषयावर संवाद साधला. अर्चना शंतिकुमार पाटील, प्राजक्ता वैभव पाटील यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दोन्ही वक्त्यांबद्दल गुरुभक्ती करत कृतज्ञता व्यक्त केली. सुनील पाटील (एम.डी) यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून देऊन व्याख्यानमालेचा उद्देश सांगितला. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वनिता चौगुले यांनी आभार मानले. विश्वस्त वृषभ पाटील, अप्पासाहेब पाटील, अभय पाटील, तुषार पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05053 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..