कामधेनू दूध संस्था १४ लाखांचे फरक बिल देणार ः विनोद पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामधेनू दूध संस्था १४ लाखांचे फरक बिल देणार ः विनोद पाटील
कामधेनू दूध संस्था १४ लाखांचे फरक बिल देणार ः विनोद पाटील

कामधेनू दूध संस्था १४ लाखांचे फरक बिल देणार ः विनोद पाटील

sakal_logo
By

07237

------
कामधेनू दूध संस्था १४ लाखांचे
फरक बिल देणार ः विनोद पाटील
घुणकी, ता. ३०: पाडळी येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या दूध उत्पादकांना दीपावलीस १४ लाखांचे फरक बिल देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.
पाडळी (ता. हातकणंगले) येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेची वार्षिक सभा झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रकाश पाटील होते. अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘संस्थेचे शेअर भांडवल ६ लाख २९ हजार ८८५ रुपये आहे. म्हैस दूध उत्पादकांना प्रति रुपयास ११ पैसे, गायीस ६ पैसेप्रमाणे १४ लाखांचे फरक बिल वाटप करण्यात येणार आहे. दूध उत्पादकांची शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांचे जनावर दगावल्यास दोन हजार रुपये आर्थिक मदत, यात्रेस श्रीखंड वाटप करण्यात येईल.’
जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना रोख रक्कम व शिल्ड देऊन सन्मानित केले. उपाध्यक्ष सुरेखा पाटील, संचालक संपत पाटील, बाळासाहेब पाटील, मोहन पाटील, शशिकांत पाटील, विक्रम मुळीक, निवृत्ती गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05054 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..