घुणकी परिसरात पारंपरिक वाद्यांसह गुलालाची उधळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुणकी परिसरात पारंपरिक वाद्यांसह गुलालाची उधळण
घुणकी परिसरात पारंपरिक वाद्यांसह गुलालाची उधळण

घुणकी परिसरात पारंपरिक वाद्यांसह गुलालाची उधळण

sakal_logo
By

घुणकी परिसरात पारंपरिक वाद्यांसह गुलालाची उधळण
घुणकी, ता. १० : हातकणंगले तालुक्यातील किणी, घुणकी, चावरे, तळसंदे, नवेपारगाव, जुने पारगाव, निलेवाडी, पाडळी, मनपाडळे, अंबप, वाठार परिसरात फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक वाद्यांसह साउंड सिस्टीमच्या वापरसह गुलालाच्या उधळणीत ‘गणेश, गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’च्या जयघोषात, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाला निरोप दिला. सकाळी आठपासून रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. गेल्या दोन वर्षांत गणेशोत्सव साजरा झाला नसल्याने यावेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह दिसला. गणरायाचे विसर्जन झांथपथक, धनगरी ढोल, बँड, बेंजो, डॉल्बीवर तरुणाई थिरकली. या परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन वारणा नदीसह तलावात झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05067 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..