पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

07321
किणी : येथील पथकर नाक्यावरील पथकर वसुली बंद करण्याच्या मागणीसाठी आलेल्या मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना ताब्यात घेताना पोलिस.

किणी नाक्यावर मनसेचे
पदाधिकारी ताब्यात

पोलिसांनी आंदोलन दडपल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १९ : राष्ट्रीय महामार्गावरील किणी (जि. कोल्हापूर) व तासवडे (जि. सातारा) येथील पथकर वसुलीची मुदत संपल्यानंतरही सुरू असलेली पथकर वसुली बंद करण्याच्या मागणीसाठी आलेल्या मनसेच्या वाहतूक सेनेचे आंदोलन होण्याआधीच पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन झाले नाही. पोलिसांनी आंदोलन दडपल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
मुदत संपली असतानाही पथकर वसुली सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या खर्चाचा व वसुलीचा हिशेब न देता वाहनधारक जनतेला लुटण्याचे काम ठेकेदार, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी यांच्या संगनमताने सुरू आहे. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखालील रॅलीने निषेधाच्या घोषण देत किणी पथकर नाक्यानजीक आले.
तत्पूर्वी पथकर नाक्यावर जलद कृतिदलाच्या तीन तुकड्यांसाह वडगाव, हातकणंगले, जयसिंगपूर येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने होते. आंदोलकाना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या, अग्निशमन दल अशी जय्यत तयारी होती. आंदोलक आंदोलनस्थळी येण्यापूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकाना पथकर नाक्यापासून दूरच रोखले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढण्यासाठी आणलेली तिरडी अगोदरच पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून काढून घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
वडगावचे पोलिस निरीक्षक भैरवनाथ तळेकर यांचेशी तिरडी काढून घेतल्याबद्दल वाद झाला. ‘टोल वसुली थांबलीच पाहिजे’, ‘वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे’ पोस प्रशासनाचा निषेध अशा घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वडगांव पोलीस ठाण्यात नेले.
या वेळी प्रवीण माने, संजय पाटील, नयन गायकवाड, फिरोज मुल्ला, सुनील लोखंडे यांचेसह महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे किणी पथकर नाक्यावर पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.


किणी पथकर नाक्यावर आंदोलन करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊनही लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन पोलिसांनी दडपले. कोणतेही नुकसान नाही, एकही दगड मारला नाही तरीही आंदोलनाधीच पोलिसांनी का कारवाई केली? पोलिसांनी कितीही बळाचा वापर केला तरी बेकायदेशीररित्या सुरू असणारा टोल नाका बंद केल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही.
-राजू जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना, कोल्हापूर
---

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05098 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..