सर्वोदय पतसंस्थेस साडेपंधरा लाखांवर नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोदय पतसंस्थेस साडेपंधरा लाखांवर नफा
सर्वोदय पतसंस्थेस साडेपंधरा लाखांवर नफा

सर्वोदय पतसंस्थेस साडेपंधरा लाखांवर नफा

sakal_logo
By

सर्वोदय पतसंस्थेस साडेपंधरा लाखांवर नफा
घुणकी, ता. २२ : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात १५ लाख ४९ हजार रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा अध्यक्ष माधव प्रभाकर गुळवणी यांनी केली. तळसंदे येथील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा झाली. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. गुळवणी बोलत होते.
श्री. गुळवणी म्हणाले, ‘पतसंस्थेची गुंतवणूक ६ कोटी ७ लाख असून, वार्षिक उलाढाल २४ कोटी १ लाख रुपये आहे. संस्थेच्या ७ कोटी ७५ लाखांच्या ठेवी असून, २ कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेने सभासदांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.’
सचिव भैरू चव्हाण यांनी विषयवाचन व अहवालवाचन केले. पतसंस्थेने केडीसीसी बँकेच्या शाखा पारगावमध्ये १ कोटी ठेव ठेवल्याने
केडीसीसी बँकेच्या वतीने अभिनंदन केल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. उपाध्यक्ष संपत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, अनंत भोसले, दिलीप चव्हाण, हंबीरराव चव्हाण, सर्जेराव चव्हाण, राजेंद्र शिंदे, मारुती वडर, भानुदास कांबळे, राजू तांबोळी आदी उपस्थित होते. संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संचालक दिलीप चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05104 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..