पाटील कृषी संकुलाच्या ३४ विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील कृषी संकुलाच्या ३४ विद्यार्थ्यांची निवड
पाटील कृषी संकुलाच्या ३४ विद्यार्थ्यांची निवड

पाटील कृषी संकुलाच्या ३४ विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

पाटील कृषी संकुलाच्या ३४ विद्यार्थ्यांची निवड
घुणकी, ता. २३ ः तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांची विविध विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी निवड झाली.
डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आय. आय. टी खरगपूर, तर आय. आय. टी. मुंबई, पंजाब आणि वारंगल येथे प्रत्येकी एकाची निवड झाली आहे. उदयपूर येथील महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये दोन, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, पुण्याच्या वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे प्रत्येकी एकाची निवड झाली. डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे तर राहुरी विद्यापीठ संलग्न पुणे, कोल्हापूर व बारामती महाविद्यालयांमध्ये ६, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे दोन, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे एका विद्यार्थ्याची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना ‘कृषी अभियांत्रिकी’चे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमिक इन्चार्ज प्रा. पी. डी. उके व प्रा. आर. आर. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05106 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..