स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेस २ कोटी ५२ लाख नफा : प्राचार्य अभयकुमार साळुंखे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेस २ कोटी ५२ लाख नफा : प्राचार्य अभयकुमार साळुंखे
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेस २ कोटी ५२ लाख नफा : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेस २ कोटी ५२ लाख नफा : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

sakal_logo
By

07396

------------
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक
पतसंस्थेस दोन कोटींवर नफा : प्राचार्य साळुंखे

घुणकी, ता. ४ : राज्य कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेस दोन कोटी ५२ लाख नफा झाल्याची माहिती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी दिली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तम गलांडे म्हणाले, ‘‘२९०० सभासद असून २० कोटी भागभांडवल आहे. ३३ कोटी २५ लाख ठेवी असून ४७ कोटी २० लाख कर्ज वितरण केले आहे. १० टक्के लाभांश देण्याचा ठराव सभेत संमत झाला.’’ उपाध्यक्ष शशिराव शेंडगे, सरव्यवस्थापक संपतराव वेटाळे यांची भाषणे झाली. संचालक दिलीप चरणे, संजय जाधव, जयप्रकाश पाटील, सुनील पाटील, लक्ष्मण महानवर आदी उपस्थित होते.