राजेंद्र हायस्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेंद्र हायस्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिन
राजेंद्र हायस्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिन

राजेंद्र हायस्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिन

sakal_logo
By

वाचन प्रेरणा दिन
-------------
राजेंद्र हायस्कूल
घुणकी : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित अंबप (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन निमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा झाला. मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील यांनी केले. पुस्तकांचे प्रदर्शन ग्रंथपाल मुकेश पाटील यांनी आयोजित केले. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला. जागतिक हातधुवा दिना निमित्त हातधुण्याचे प्रात्यक्षिक अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका सौ. गावित यांनी दिले. डॉ. कलाम यांच्या विषयी दिव्या कुलकर्णी, जेष्ठ शिक्षक दिलीप चरणे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील यांची भाषणे झाली. सुनील कावळे, रवींद्र सूर्यवंशी, नवनाथ शेरखाने, भारती पाटील, राजू दाभाडे, सुनील कांबळे उपस्थित होते.
----------------
नाईट कॉलेज
इचलकरंजीत ः महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले. उद्‍घाटन प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे वाचनाचा छंद जोपासला तर विचार प्रगल्भ होतात, असे विचार प्राचार्य डॉ. नारे यांनी मांडले. ग्रंथालयातील शब्दकोश, व्युत्पत्तीकोश, संस्कृती कोश असे मौलिक ग्रंथ तसेच आधुनिक वाङ्मयातील नावीन्यपूर्ण ग्रंथ प्रदर्शनामध्ये मांडले होते. ग्रंथपाल डॉ. गणेश खांडेकर, अधीक्षक एस. एन. पटेल यांच्याहस्ते डॉ कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.