तळसंदे उपसरपंचपदी मनिषा संकपाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळसंदे उपसरपंचपदी मनिषा संकपाळ
तळसंदे उपसरपंचपदी मनिषा संकपाळ

तळसंदे उपसरपंचपदी मनिषा संकपाळ

sakal_logo
By

07513
-------
तळसंदे उपसरपंचपदी मनीषा संकपाळ
घुणकी, ता. २३ : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील उपसरपंचपदासाठी मनीषा संकपाळ व विजया चव्हाण यांच्यात झालेल्या निवडणुकीत मनीषा संकपाळ यांचा एकतर्फी विजय झाला. लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच शिवाजी पाटील यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त होती. मनीषा संकपाळ यांना १२, तर विजया चव्हाण याना केवळ एक मत मिळाले. अमरसिंह शिंदे, राजेंद्र शिंदे व अर्चना पाटील हे तीन सदस्य अनुपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य महेश कुंभार, शिवाजी पाटील, प्रकाश कोळी, सावित्री चव्हाण, सुनीता चव्हाण, शांताबाई पाटील, विशाल चव्हाण, नरेश कांबळे, सुधा कांबळे, विजया चव्हाण, जयश्री संकपाळ, ग्रामविकास अधिकारी सुनील सुतार उपस्थित होते.