अजिनोमोटोच्या अतिवापराने अकाली वार्धक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजिनोमोटोच्या अतिवापराने अकाली वार्धक्य
अजिनोमोटोच्या अतिवापराने अकाली वार्धक्य

अजिनोमोटोच्या अतिवापराने अकाली वार्धक्य

sakal_logo
By

07518
-----
अजिनोमोटोच्या अतिवापराने अकाली वार्धक्य
डॉ. ज्योत्स्ना समाज; किणी येथे आयुर्वेद आरोग्य आणि गर्भ संस्कार कार्यक्रम
घुणकी, ता. २४ : नैसर्गिक पद्धतीने शिजवलेले अन्न जास्त पौष्टिक असून स्त्रियांनी कृत्रिम साधनांचा वापर टाळून स्वयंपाकात पारंपरिक पद्धतीचा वापर करावा. संतुलित आणि नैसर्गिक आहार पद्धतीचा वापर केल्यास औषधांची गरजही भासणार नाही. अजिमिनिटोसारख्या रासायनिक पदार्थांच्या अतिवापरामुळे माणसामध्ये अकाली वार्धक्य आणि वंध्यत्व येते, असे मत प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, गर्भसंस्कार तज्ञ डॉ. ज्योत्स्ना समाज (मुधोळ) यांनी किणी (ता. हातकणंगले) येथे व्यक्त केले.
किणी येथील स्व. भि. शी. पाटील सभागृहात आयुर्वेद आरोग्य आणि गर्भ संस्कार या कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रंजना ने. पाटील होत्या.
डॉ. समाज म्हणाल्या, ‘कोणत्याही धान्याचे पीठ सात दिवसांपेक्षा जास्त ठेऊन वापरल्यास त्यातील सत्वे आणि पौष्टिकता कमी होते. शिळे अन्नाचे सेवन केल्यामुळे सांधेदुखीचे प्रमाण वाढून आरोग्य बिघडते. अनैसर्गिक, रासायनिक, कृत्रिम साधनांच्या अतिवापरामुळे मूत्रमार्ग दोष, गर्भधारणा न होणे, नैसर्गिक प्रसूती न होणे आदी विकार होतात.’
गर्भधारीत स्त्रियांनी आयुर्वेदिक उपचार पद्धती, सकस व संतुलित आहार, योग्य व्यायाम पद्धतीचा अवलंब केल्यास सुलभ व नैसर्गिक प्रसूती होते. सिद्धिविनायक आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हारुगिरीचे प्रोफेसर आणि आयुर्वेदाचार्य डॉ. चंद्रकांत समाज यांनी ही उत्तम आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले. वारणा दूध संघाचे संचालक अँड. एन. आर. पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. सुनिल पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. शतायुषी जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बी ए. पाटील, गुंडू दणाणे, अजित पाटील उपस्थित होते. सुरेश चौगुले यांनी आभार मानले.