पाऊस बंद होऊन आठवडा होऊनही त वाठार उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस बंद होऊन आठवडा होऊनही त वाठार उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी  राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष ?
पाऊस बंद होऊन आठवडा होऊनही त वाठार उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष ?

पाऊस बंद होऊन आठवडा होऊनही त वाठार उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष ?

sakal_logo
By

07540
उचगाव : राष्ट्रीय प्राधिकरणचे अधिकाऱ्यांना निवेदन देताना वाठार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी
-------
वाठार उड्डाणपुलाखाली
पाण्याची समस्या कायम

घुणकी, ता. २५ : परतीचा पाऊस बंद होऊन आठवडा झाला तरी अद्याप राष्ट्रीय महामार्गावरील वाठार येथील उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी असल्याने चिखलमिश्रीत पाण्यातून वाहन चालकांना वाट शोधावी लागत असल्याने संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान वाठार ग्रामपंचायतीने निवेदन देऊनही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी पथकरापासून दोनच किलोमीटरवर वाठार उड्डाणपूल आहे. पुण्याहून आलेल्या वाहनांना सांगलीहून रत्नागिरीकडे जाण्यासाठी वारणानगर मार्गे जवळचा मार्ग आहे. वारणानगर येथे वारणा उद्योगसमूह व वडगाव व कोडोलीत बाजारपेठेमुळे परिसरातील नागरिकांची उड्डाणपुलाखालून वर्दळ असते. पावसाचे पाणी महामार्गाच्या दोन्ही सेवा मार्गावरून थेट उड्डाणपुलाखाली येते. पाणी पुढे जाण्यासाठी व्यवस्था केली नसल्याने पाणी साचून राहते. पाण्यात मातीमिश्रीत गाळ साचल्याने पाण्यातून जाताना मोटरसायकली घसरतात आणि अपघात होतो. या बाबत वाठार ग्रामपंचायतीने अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाणी निर्गतीकरणासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.