सर्वोच्च सीईटी गुण मिळवणाऱ्या प्रज्ञाचे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोच्च सीईटी गुण मिळवणाऱ्या प्रज्ञाचे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात स्वागत
सर्वोच्च सीईटी गुण मिळवणाऱ्या प्रज्ञाचे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात स्वागत

सर्वोच्च सीईटी गुण मिळवणाऱ्या प्रज्ञाचे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात स्वागत

sakal_logo
By

07550
तळसंदे : प्रज्ञाचे स्वागत करताना प्राचार्य प्रा. शेलार, प्रा. आर. आर. पाटील, डॉ. व्ही. आर. पाटील आदी.
-----------

प्रज्ञाचे भोसलेचे स्वागत
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील कृषी व कृषीसंलग्न पदवी अभ्यासक्रमासाठी सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये एमएच-सीईटी परीक्षेमध्ये ९९.५५ टक्के गुण मिळवून डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रज्ञा मानसिंग भोसले हिचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांच्या हस्ते स्वागत झाले. महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद, पुणेकडून प्रथमवर्ष कृषी व कृषीसंलग्न पदवी प्रथम वर्ष पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची यादी जाहीर झाली. डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे. अकॅडमीक इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील, डॉ. व्ही. आर. पाटील आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व कार्यकारी संचालक, डॉ. ए. के. गुप्ता यांनी प्रज्ञाचे अभिनंदन केले.