घुणकीत सख्या भावांचा तासाभराच्या अंतराने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुणकीत सख्या भावांचा तासाभराच्या अंतराने मृत्यू
घुणकीत सख्या भावांचा तासाभराच्या अंतराने मृत्यू

घुणकीत सख्या भावांचा तासाभराच्या अंतराने मृत्यू

sakal_logo
By

07556,
07557
१)बाबासाहेब बाणदार
२) शब्बीर बाणदार
.............


घुणकीत सख्ख्या भावांचा
तासाभराच्या अंतराने मृत्यू


घुणकी, ता. ३० : येथे मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी समजताच लहान भावाचा तासाभराच्या अंतराने मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. माजी सैनिक बाबासाहेब बापू बाणदार (वय ६६) व शब्बीर बापू बाणदार (वय ६३) अशी त्यांची नावे आहेत.
येथील बाबासाहेब बापू बाणदार हे भारतीय सैन्य दलाच्या सेवेतून निवृत्त झाले होते. ते आजारी होते. त्यांचे निधन आज दुपारी ३.३० वाजता वारणानगर येथील खासगी रुग्णालयात झाले. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच धक्क्याने लहान भाऊ शब्बीर बाणदार यांचेही निधन दुपारी ३.४५ वाजता झाले. ही माहिती गावात मिळताच गावात हळहळ व्यक्त झाली. या दोन भावांवर येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जियारत विधी मंगळवारी (ता. १) सकाळी १० वाजता घुणकी येथे आहे.
------