कबड्डी स्पर्धेत किणी हायस्कूल प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डी स्पर्धेत किणी हायस्कूल प्रथम
कबड्डी स्पर्धेत किणी हायस्कूल प्रथम

कबड्डी स्पर्धेत किणी हायस्कूल प्रथम

sakal_logo
By

07644

-----
कबड्डी स्पर्धेत किणी हायस्कूल प्रथम
घुणकी, ता. २३ : हातकणंगले तालुकास्तरीय शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात किणी हायस्कूलच्या संघाने आयडियल इंग्लिश स्कूल शिरोलीच्या संघावर ११ गुणांनी मात करत प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल हुपरी संघाने सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल तळंदगे संघावर मात करत विजय मिळवला.
किणी हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा झाल्या. १४ वर्षांखालील कबड्डी स्पर्धेसाठी मुलांचे ४३ संघ, तर मुलींचे १८ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्‍घाटन किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुनील कदम, हातकणंगले तालुका स्पर्धाप्रमुख संताजी भोसले, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, मुख्याध्यापिका एस. बी. शिरोटे, पर्यवेक्षक बी. डी. मलगुंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एस. के. धनवडे यांनी केले. पी. एन. पाटील यांनी आभार मानले.