डांगे, वडगाव, रजत स्कूल विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांगे, वडगाव, रजत स्कूल विजेते
डांगे, वडगाव, रजत स्कूल विजेते

डांगे, वडगाव, रजत स्कूल विजेते

sakal_logo
By

07651

--------------------------------
डांगे, वडगाव, रजत स्कूल विजेते
हातकणंगले तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा; विजेत्यांची जिल्हास्तरीयसाठी निवड

घुणकी, ता. २५ : हातकणंगले तालुकास्तरीय शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षाखाली मुले गटातआण्णासाहेब डांगे कालेज, मुली गटात वडगाव विद्यालय, १७ वर्षाखालील मुले गटात आण्णासाहेब डांगे कालेज,मुली गटात रजत इंग्लिश मेडियम स्कूल हुपरीय यांनी विजेतेपद पटकावले.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात आण्णासाहेब डांगे ज्यु. कॉलेज संघाने शामराव पाटील ज्यु. कॉलेज तळसंदे संघावर विजय मिळवला. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात वडगाव विद्यालयाने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. किणी हायस्कूल किणीच्या ( ता. हातकणंगले) मैदानावर स्पर्धा झाल्या. विजेत्या संघांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेचा निकाल असा ः १७ वर्षाखालील मुले, अनुक्रमे विजेते, उपविजेते असे ः आण्णासाहेब डांगे ज्युनिअर कॉलेज, हातकणंगले, बळवंतराव यादव ज्युनिअर कॉलेज, वडगाव. मुली ः रजत इंग्लिश मेडियम स्कूल हुपरी, छ. शिवाजी हायस्कूल, घुणकी.
१९ वर्षाखालील मुले ः अण्णासाहेब डांगे ज्यु. कॉलेज, हातकणंगले, शामराव पाटील ज्युनिअर कॉलेज, तळसंदे. मुली ः वडगाव विद्यालय वडगाव, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे. मुख्याध्यापिका एस. बी. शिरोटे, पर्यवेक्षक बी. डी. मलगुंडे, स्पर्धा संयोजक एस. के. धनवडे, पी. एन. पाटील, अभिजीत पाटणे, इम्रान अरब आदींनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले.