
डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात " सायन्स क्लब"चे उदघाटन
07740
तळसंदे : सायन्स क्लबचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. के. प्रथापन. समवेत डॉ. मोटे, डॉ. वाटेगावकर.
पदवी अभ्यासक्रमापासूनच
संशोधनाला प्रारंभ व्हावा
डॉ. प्रथापन; सायन्स क्लबचे उद्घाटन
घुणकी, ता. १२ : विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमापासूनच संशोधनाला प्रारंभ व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञानाला संशोधनाची जोड देऊन भविष्यातील जागतिक आव्हानांना सामोरे जाणे गरजेचे आहे. भविष्यात भारताला नोबेल पारितोषिक मिळवून देतील असे सक्षम संशोधक घडवू, असे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातील एमएस्सी रसायनशास्त्र विभाग आयोजित ‘केम फ्युजन’ या सायन्स क्लबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. असोसिएट डीन डॉ. गुरुनाथ मोटे, डॉ. जयंत घाडगे, डॉ. तानाजी भोसले, डॉ. संदीप वाटेगावकर उपस्थित होते.
शास्त्रज्ञ डॉ. फ्रेंझ हेबर, डॉ. आल्फ्रेड व्हर्नर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या क्लबची स्थापना करण्यात आली.
अंकिता गुरव, मयुरी आटपाडकर, प्रथमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पूजा पवार, ऐश्वर्या चव्हाण यांनी आभार मानले. विद्यार्थी समन्वयक तुषार पाटील, शर्वरी पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.