अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज.
अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज.

अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज.

sakal_logo
By

अंबपला माने-पाटील गटात
सत्तेसाठी निकराची झुंज.

सरपंचपदासाठीही काट्याची टक्कर
----
संजय पाटील ः सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १२ : अंबप (ता. हातकणंगले) येथे पारंपरिक राजकीय कट्टर विरोधक असलेल्या माने विरुद्ध पाटील गटातच सत्तेसाठी दुरंगी लक्षवेदी लढत होत आहे. लोकनियुक्त सरपंचपद ओबीसी महिला आरक्षण आहे. सरपंचपदासाठी माने गटाच्या दीप्ती विकासराव माने विरुद्ध पाटील गटाच्या प्राजक्ता शिवराज पाटील यांच्यात प्रचंड चुरस होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने विरुद्ध बापूसाहेब पाटील संस्था समूहाचे प्रमुख ॲड. राजवर्धन पाटील यांच्या दोन गटांतील संघर्ष सर्वश्रुत आहे. माने गटाचे नेतृत्व विजयसिंह माने, विकासराव माने, माजी उपसरपंच राजेंद्र माने, वारणा बझारचे संचालक विश्वनाथ पाटील, प्रसाद पाटील, संतोष उंडे, माजी सरपंच संपतराव कांबळे करीत आहेत. पाच वर्षांत सात कोटींची विकासकामे व वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पाठपुरावा केल्याने सत्ता मिळण्याचा दावा माने गटाने केला. बापूसाहेब पाटील सहकार समूहाच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करणाऱ्या पाटील गटाने अंबप ग्रामविकास परिवर्तन पॅनेल केले आहे. पाटील गटाचे नेतृत्व सहकार समूहाचे प्रमुख ॲड. राजवर्धन पाटील, नितीन तोडकर, माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, पंडितराव लोकरे, नंदकुमार पाटील, गणेश सहकार समूहाचे प्रमुख रामकृष्ण लोकरे, भिवाजी कांबळे करीत आहेत. सत्ता नसतानाही आमदार राजूबाबा आवळे, आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून दीड कोटींची कामे व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मुद्दा घेऊन सत्ता मिळवण्याचा दावा पाटील गटाने केला आहे.
गतवेळीच्या दुरंगी निवडणूकीत माने गटाने दहा जागा जिंकून लोकनियुक्त सरपंचपद मिळवून सत्ता स्थापन केली. पाटील गटाने पाच जागा जिंकल्या होत्या. राजेंद्र माने यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मते जिंकून विक्रम केला होता. माने गटाकडून बी.एस. अंबपकर तर पाटील गटाकडून संपतराव कांबळे निवडणूक लढले. माने गटाचे अंबपकर विजयी झाले. आता संपतराव कांबळे माने गटात आहेत. प्रचारात दोन्ही गटांनी आघाडी घेतली आहे.
-------
एकूण प्रभाग : ५
मतदार संख्या : ५६४१
सदस्यसंख्या :१५
सरपंच : लोकनियुक्त
सरपंच आरक्षण : ओबीसी महिला