अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज.
अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज.

अंबपमध्ये माने व पाटील गटात सत्तेसाठी निकराची झुंज.

sakal_logo
By

सरपंचपदासाठी
अंबपला काट्याची टक्कर
----
संजय पाटील ः सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १५ : अंबप (ता. हातकणंगले) येथे पारंपरिक राजकीय कट्टर विरोधक असलेल्या माने विरुद्ध पाटील गटातच सत्तेसाठी दुरंगी लक्षवेधी लढत होत आहे. लोकनियुक्त सरपंचपद ओबीसी महिला आरक्षण आहे. सरपंचपदासाठी माने गटाच्या दीप्ती माने विरुद्ध पाटील गटाच्या प्राजक्ता शिवराज पाटील यांच्यात चुरस आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने विरुद्ध बापूसाहेब पाटील संस्था समूहाचे प्रमुख ॲड. राजवर्धन पाटील यांच्या दोन गटांतील संघर्ष सर्वश्रुत आहे. माने गटाचे नेतृत्व विजयसिंह माने, विकासराव माने, माजी उपसरपंच राजेंद्र माने, वारणा बझारचे संचालक विश्वनाथ पाटील, प्रसाद पाटील, संतोष उंडे, माजी सरपंच संपतराव कांबळे करीत आहेत. बापूसाहेब पाटील सहकार समूहाच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करणाऱ्या पाटील गटाने अंबप ग्रामविकास परिवर्तन पॅनेल केले आहे. या गटाचे नेतृत्व सहकार समूहाचे प्रमुख ॲड. राजवर्धन पाटील, नितीन तोडकर, माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, पंडितराव लोकरे, नंदकुमार पाटील, भिवाजी कांबळे करीत आहेत.
गतवेळीच्या दुरंगी निवडणूकीत माने गटाने दहा जागा जिंकून लोकनियुक्त सरपंचपद मिळवून सत्ता स्थापन केली. पाटील गटाने पाच जागा जिंकल्या होत्या. प्रचारात दोन्ही गटांनी आघाडी घेतली आहे.
-------
एकूण प्रभाग : ५
मतदार संख्या : ५६४१
सदस्यसंख्या :१५
सरपंच : लोकनियुक्त
सरपंच आरक्षण : ओबीसी महिला