चावरेत नेतृत्वाचाच कस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चावरेत नेतृत्वाचाच कस
चावरेत नेतृत्वाचाच कस

चावरेत नेतृत्वाचाच कस

sakal_logo
By

चावरेत नेतृत्वाचाच कस

घुणकी, ता. १४: चावरे (ता. हातकणंगले) येथे जनसेवा विकास पॅनेल विरुद्ध चावरे ग्रामविकास पॅनेलमध्ये सरळ आणि प्रतिष्ठेची लढत होण्याची शक्यता आहे.
हातकणंगले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, वारणा बँकेचे माजी संचालक माणिकराव निकम व शेतकरी संघटनेचे हरिभाऊ जाधव यांचे जनसेवा विकास पॅनेल आहे. वारणा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील व वडगाव बाजार समितीचे संचालक बी. जी. बोराडे यांचे चावरे ग्रामविकास पॅनेल आहे. या दोन गटातील ईर्षा टोकाला पोहचली आहे. एकेका मतासाठी संघर्ष सुरू आहे.
लोकनियुक्त सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष आहे. सरपंचपदासाठी हातकणंगले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील व
वारणा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह सर्जेराव पाटील, स्वरुप शंकर पाटील अशी तिहेरी लढत होत आहे.
गतवेळीच्या तिरंगी निवडणूकीत जगन्नाथ पाटील गटाने चार जागा जिंकून लोकनियुक्त सरपंचपद मिळवले. शारदा शिवाजी गुरव या ओबीसी महिला सरपंच झाल्या होत्या. उदयसिंह पाटील गटाने सहा जागा जिंकल्या होत्या. बी. जी. बोराडे यांच्या गटाला फक्त एक जागा मिळाली होती. यावेळी दुरंगी लढत होत असल्याने येथील सरपंचपदाची माळ कोणत्या ''पाटील'' यांच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष परिसराचे लक्ष लागले आहे.
-----
दृष्टीक्षेपात...
एकूण प्रभाग : ४
मतदार संख्या : ३४१५
सदस्य संख्या :११
सरपंच : लोकनियुक्त
सरपंच आरक्षण : सर्वसाधारण पुरुष